मोदी भारताचे राजे नाहीत! भाजप खासदारानेच विरोधात उघडली आघाडी

भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे.
bjp mp subramanian swamy says modi is not king of india
bjp mp subramanian swamy says modi is not king of india
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. मोदी हे भारताचे राजे नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे. मोदींच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणाला माझा विरोध आहे, अशी जाहीर भूमिकाही त्यांनी केली आहे. 

मागील काही दिवसांपासून स्वामी हे आपल्याच सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात स्वामींना स्थान देण्यात आले नाही, याबाबत एका व्यक्तीने स्वामी यांनी ट्विटरवर छेडले. तुम्हाला मंत्रिपद न मिळाल्याने तुम्ही भाजप सरकारवर टीका करीत आहात, असा आरोप त्या व्यक्तीने केला. यावर स्वामी यांनी उत्तर दिले असून, त्यांनी थेट मोदींवर निशाणा साधला आहे. 

स्वामी यांनी म्हटले आहे की, मी मोदीविरोधी आहे. माझा मोदींच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांना विरोध आहे. यासंबंधी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींशी समोरासमोर चर्चा करण्यासही मी तयारी आहे. तुम्ही सहभागाच्या तत्वावर चालणारी लोकशाही ऐकली आहे का? मोदी हे काय भारताचे राजे नाहीत. 

काही दिवसांपूर्वी स्वामी यांनी भाजपच्या आयटी सेलला लक्ष्य केले होते. भाजपच्या आयटी सेलवरून सोशल मीडियावर अक्षरशः घाण पसरवली जात आहे. अमित मालवीय यांच्या अध्यक्षतेखालील हा सारा विभाग बदमाश तसेच धूर्त बनल्याची टीका स्वामी यांनी केली होती. स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मालवीय यांना त्वरित पदावरून हटवा, अशी मागणी केली होती. स्वामी यांनी भाजपच्या आयटी सेलचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनाच निशाण्यावर घेतले आहे. मात्र, अमीत मालवीय यांनी स्वामी यांना थेट प्रत्युत्तर दिलेले नाही. 

मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार व फेररचना नुकतीच झाली. नव्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मंत्र्यांना डच्चू दिल्यानंतर अनेक मंत्र्यांची महत्वाची खातीही बदलण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. तर आरोग्य मंत्रिपदाचा भार मनसुख मांडवीय यांच्याकडे देण्यात आला आहे. शिक्षण खाते धमेंद्र प्रधान तर नारायण राणे यांच्याकडं सुक्ष्म, लघु उद्योग मंत्र्यालय देण्यात आले आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी आपल्याकडे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयही ठेवले आहे. स्मृती इराणींकडील वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी काढून त्यांना पुन्हा महिला व बाल कल्याण मंत्री करण्यात आले. वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी पीयूष गोयल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडी रेल्वे खाते अश्विनी वैष्णव यांना मिळाले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना नागरी हवाई वाहतूक मंत्रिपद देण्यात आले आहे. हरजितसिंह पुरी यांची बढती झाली असून त्यांना पेट्रोलियम व नगर विकास मंत्रिपद मिळाले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com