Loksabha Election 2024 : कोकणच्या जागेवर भाजपाचा दावा, शिंदे सेनेचा भ्रमनिरास!

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency : महायुतीच्या मित्रपक्षांतच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे.
Narayan Rane and Eknath Shinde
Narayan Rane and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

संजय परब

Kokan Politics News : कोकणात लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय शिमगा रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण सत्ताधारी महायुतीच्या मित्रपक्षांतच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत ही जागा भाजपा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपाचा उमदेवार कोण असेल याविषयी अजून निर्णय झाला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून किरण सामंत यांची या मतदारसंघातून उभे राहण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

किरण सामंत हे उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांचे बंधू असून यांनी अनेकवेळा आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं जाहीरपणे बोलूनही दाखवलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी रत्नागिरी हा मतदार संघ बांधायला सुद्धा घेतला आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नवं ट्विट केल्यामुळे शिंदे शिवसेना आणि भाजपा यांच्यात या जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narayan Rane and Eknath Shinde
Ashatai Shinde News : ...अन् 'शेकाप'च्या आशाताई शिंदेंनी काँग्रेसचा 'हात' ऐनवेळी नाकारला!

“लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवित आहेत. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे”, असं नारायण राणे(Narayan Rane) ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत(Vinayak Raut) हे खासदार आहेत. ते गेल्या दोन लोकसभा निवडणुकींमध्ये या मतदारसंघांमधून निवडून येत आहेत. तर नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे हे काँग्रेसच्या तिकीटावर 2009 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. पण त्यानंतर सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला.

या दरम्यान त्यांचे वडील नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपाने राज्यसभेची संधी दिली. पण आता त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपाने नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेची संधी दिलेली नाही. त्यामुळे नारायण राणे यांना लोकसभेची संधी दिली जाईल. ते लोकसभा निवडणूक लढवणार, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Narayan Rane and Eknath Shinde
Sameer Wankhede News : समीर वानखेडे भाजप तिकिटावर लोकसभा लढणार?

भाजपाकडून याआधी आमदार रवींद्र चव्हाण आणि प्रमोद जठार यांच्या नावाची चर्चा होती. यानंतर पुढे निलेश राणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. आता नारायण राणे सिंधुदुर्ग-रत्नागिरी जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेची जास्त ताकद आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून या जागेवर दावा सांगितला जातोय. पण आता शिवसेनेत फुट पडली आहे.

तसेच निलेश राणे या मतदारसंघातले माजी खासदार आहे. नितेश राणे(Nitesh Rane) याच मतदारसंघातून आमदारही आहेत. त्यामुळे नारायण राणे यांच्याकडून आता या मतदारसंघातून दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत आगामी काळात काय काय? घडामोडी घडतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnapaekhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com