

Mumbai News : बिहार निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणावर त्यांचा मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः काँग्रेसने येत्या काळात होत असलेली मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेतील चित्र 360 डिग्रीमध्ये बदलणार आहे. त्यामुळे येत्या काळात काय चित्र असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केल्याने आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या निर्णयाचा येत्या काळात कोणाला फायदा होणार कोणाला फटका? बसणार याची उत्सुकता लागली आहे.
काँग्रेसच्या (Congress) या घोषणेनंतर पूर्वीप्रमाणे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी होणार नाही. तर आता सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईतील प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत होणार आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, मनसे व काँग्रेस चारही पक्ष एकमेकाविरोधात लढले होते. त्याचमुळे आता येत्या निवडणुकीत हे चार पक्ष स्वबळावर लढले तर महापालिकेत त्रिशंकू अवस्था होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वार्डात चुरशीची लढत होणार असून त्यामुळे ऐनवेळी अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्सुकता आधीच ताणली गेली आहे.
महाविकास आघाडीमधील काँग्रेस बाहेर पडल्याने आता महाविकास आघाडीतील इतर पक्षासाठी वाट बिकट असणार आहे. निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीमधील पडलेल्या फुटीचा फायदा भाजपला (BJP) मोठ्या प्रमाणात होणार आहे. भाजपला हे दोन पक्ष स्वबळावर लढल्यास मोठा फायदा होणार असून कमी मतांच्या फरकाने विजय मिळवता येणार आहे. त्यामुळेच येत्या काळात हिंदुत्वाचे कार्ड वापरात भाजपकडून पारंपरिक मतदानावर टिकवून ठेवलयाने त्याचा फायदा होणार आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाला प्रत्यक्ष या फुटीमुळे प्रत्यक्ष शिवसेनेसोबत जोडले गेलेले. मराठी मतदार टिकून राहणार आहेत तर सोबतच त्यांना मराठी भाषिक मतदारांचा अधिक फायदा होणार आहे. मुंबईतील मराठी अस्मिता आणि स्थानिक विकास मुद्द्याच्या भोवती फिरत आहे. त्यासोबतच मुख्य प्रवाहातील पक्षांमध्ये लढत अधिक चुरशीची आणि बहुकोणीय झाल्याने, काही विशिष्ट वॉर्डांमध्ये प्रभावी असलेल्या स्थानिक आघाड्या किंवा अपक्ष उमेदवारांना अनपेक्षित विजय मिळवण्याची संधी मिळू शकते.
आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. हे दोन भाऊ एकत्र आल्यास त्यांना मोठा फायदा होणार आहे. मनसे व ठाकरेंच्या शिवसेनेने युती केल्यास चित्र बदलणार आहे. तर आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप निर्णय घेतलेले नाही. त्यामुळे या दोन पक्षाच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून असणार आहे. तर महायुतीमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार? याची उत्सुकता लागली असून त्यावर मुंबई महापालिका निवडणुकीचे समीकरणे अवलंबून असणार आहेत.
कोणाला बसणार फटका ?
मुंबईत महायुतीला फटका बसणार आहे. येत्या काळात पक्ष संघटना मजबूत असली तरी, एकट्याने लढताना भाजप-शिवसेना युतीच्या एकत्रित ताकदीपुढे जागा मिळवणे हे मोठे आव्हान असेल. आघाडीत असताना मिळणारा अतिरिक्त पाठिंबा आणि जागांच्या वाटपातील सुरक्षितता आता नसणार आहे.
मुंबईत पक्ष संघटना मजबूत असली तरी, एकट्याने लढताना भाजप-शिवसेना युतीच्या एकत्रित ताकदीपुढे जागा मिळवणे हे मोठे आव्हान असेल. आघाडीत असताना मिळणारा अतिरिक्त पाठिंबा आणि जागांच्या वाटपातील सुरक्षितता आता नसेल. त्याशिवाय 'सेक्युलर' मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट लाभ भाजप-शिंदे गटाला होऊ शकतो.
राष्ट्रवादीची ताकद मुंबईत मर्यादित आहे. आघाडीमध्ये त्यांना काही जागा सुरक्षित मिळायच्या. आता काँग्रेस स्वबळावर लढल्यास, राष्ट्रवादीला स्वबळावर अधिक जागा जिंकणे अत्यंत कठीण जाईल. राष्ट्रवादीची ताकद मुंबईत मर्यादित आहे. आघाडीमध्ये त्यांना काही जागा सुरक्षित मिळायच्या. आता काँग्रेस स्वबळावर लढल्यास, राष्ट्रवादीला स्वबळावर अधिक जागा जिंकणे अत्यंत कठीण जाईल. आघाडीतून काँग्रेसच्या बाहेर पडण्याने आघाडीच्या एकसंधतेला मोठा धक्का बसला आहे. एकत्रितपणे भाजपला आव्हान देण्याची त्यांची क्षमता कमी झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.