

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिळून एकूण 118 जागा जिंकल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्थात ठाकरे बंधूंनी 72 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 89 आणि शिंदे शिवसेनेने 29 जागा जिंकल्या. काँग्रेस 24 आणि इतरांनी 13 जागा जिंकल्या आहेत.
20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यांनी मुंबई महापालिकेत युती करत रणनीती आखली. उद्धव ठाकरे शिवसेना 66 आणि मनसेने 6 जागा जिंकल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा सर्वात जास्त फायदा हा उद्धव ठाकरे यांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आले, तर त्याचा जास्त फायदा कुणाला होणार, असा प्रश्न निवडणुकीच्या प्रचारात विचारला जात होता. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर साम टिव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट कार्यक्रमात दिले होते. फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या महापालिका निकालाविषयी केलेले भाकीत खरे ठरले आहे.
ठाकरे बंधू एकत्रित आले याचा आनंद सर्वांना झाला आहे.त्यांना एकत्र येण्यासाठी २० वर्षे का लागली, असा सवाल फडणवीसांनी सामच्या मुलाखतीत केला होता. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा फायदा कुणाला होणार राज की उद्धव ठाकरेंना? याचे उत्तर फडणवीसांनी दिले होते. राज-उद्धव एकत्र आले त्याचा फायदा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होईल, पण या ठाकरेसेना-मनसे युतीचा फायदा राज ठाकरे यांना होणार नाही,' असे फडणवीस म्हणाले होते.
महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करताना त्यांच्या विरोधातील मताचे मोठ्या प्रमाणात विभाजन केले. ठाकरे बंधू, काँग्रेस-वंचित आघाडी, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, समाजवादी पक्ष यांना निवडणूक लढविण्यास भाग पाडले. त्यामुळे भाजप विरोधातील मताचे विभाजन करण्यात यशस्वी झाले. त्याचा फटका ठाकरे बंधूंना बसला.
मुस्लिम मते आपल्याला मिळतील, अशी आशा उद्धव ठाकरेंना होती. पण मुंबईत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने अनेक प्रभागांत आपले उमेदवार रिंगणात उतवल्याने मतांचे विभाजन झाले, ज्याचा थेट फायदा महायुतीला झाला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. वरच्या पातळीवर नेत्यांची युती झाली, तरी खालच्या पातळीवर मनसे आणि शिवसेना यांच्यात मतांचे हस्तांतरण होऊ शकले नाही. त्याचा फटका ठाकरे बंधूना या निवडणुकीत बसला आहे.
मुंबईत भाजप- शिवसेना यांच्या बलाढ्य ताकदीसमोर ठाकरे बंधूंनी लढत दिली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दुप्पट जागा जिंकत मुंबईत तरी आपणच खरी शिवसेना असल्याचे दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतल्याने मुंबईत भाजपला फायदा झाला. मात्र, शिंदेसेनेला भाजपचा फायदा झाला नाही, भाजप-शिंदेसेनेने ठाकरे बंधूंना झुंजवत ठेवत सत्तेपासून लांब ठेवले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.