Gajanan Kirtikar: शिवसेनेत राहून शिंदेंशीच वैर; गजानन कीर्तीकरांचं नेमकं दुखणं तरी काय..?

Gajanan Kirtikar On Eknath Shinde Shivsena : बाळासाहेबांची ही शैली गजानन किर्तीकर यांना प्रचंड भावली. त्यामुळे त्यांनी 1966 साली त्यांनी रिझर्व्ह बँकेतील नोकरी सोडून थेट शिवसेनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली. आता त्याच गजानन कीर्तीकरांनी मागचा पुढचा विचार न करता थेट शिंदेंसह शिवसेनेच्या कार्यपध्दतीवरही बोट ठेवलं आहे.
Gajanan Kirtikar, Eknath Shinde
Gajanan Kirtikar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Gajanan Kirtikar News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेल्या गजानन कीर्तीकर हे रोखठोक भूमिकांसाठी ओळखले जातात. तीच ओळख आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जपताना आढळून येतात. 2022 मध्ये उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना टाळी देणार्‍या गजानन कीर्तीकरांच्या (Gajanan Kirtikar) विधानांमुळे शिंदेंही चांगलेच अडचणीत आले आहेत.आता पुन्हा एकदा कीर्तीकरांनी शिंदेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महाराष्ट्रासह मुंबईच्या राजकारणात'गजाभाऊ' म्हणून ओळखले जात असलेल्या गजानन कीर्तीकरांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुख्य नेते शिंदेंच्या शिवसेनेत येऊन अडीच वर्षे झाले पण माझ्या अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही. तसेच त्यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपप्रणित असल्याचा हल्लाबोल केला आहे.

या टीकेमुळे त्यांच्याविषयी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत नाराजीचा सूर आहे.पण गजाभाऊंनी ही पहिल्यांदाच खदखद बाहेर काढलेली नाही.यापूर्वीही अनेकदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आल्यावर त्यांनी सातत्यानं एकापाठोपाठ एक टीकेचे बाण सोडले आहेत. पण गजाभाऊंचं दुखणंच वेगळं आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत एकाच म्यानात सध्या दोन तलवारी आहेत. एक 'गजाभाऊ' म्हणजेच गजानन कीर्तीकर आणि दुसरी 'रामभाऊ' अर्थात रामदास कदम हे आहेत. या दोन्ही नेत्यांकडे शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून पाहिले जाते. या दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त संघर्षाची ठिणगी पहिल्यापासूनच पडलेली आहे. मग त्याचा कधीतरी भडका उडाल्याचं दिसून येतं.काही दिवसांपूर्वी तर या दोन्ही नेते टीकेची राजकीय पातळी सोडत थेट वैयक्तिक आयुष्यावरही घसरले होते.

Gajanan Kirtikar, Eknath Shinde
Maharashtra Politic's : वर्धापनदिनीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे धक्के; बालेकिल्ल्यातील दोन युवा शिलेदार भाजपने फोडले

दुसरीकडे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या सोबत आल्यावर गजानन कीर्तीकर यांना लोकसभेच्या तिकीटाची अपेक्षा होती. पण शिंदेंनी तिथे नवी चाल खेळताना उद्धव ठाकरेंच्या रवींद्र वायकरांनाच फोडलं. आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत अमोल कीर्तीकरांविरोधात थेट रवींद्र वायकरांना मैदानात उतरवलं आणि निवडूनही आणलं. हा धक्का कीर्तीकरांना पुत्रप्रेम हा चांगलाच लागल्याचे बोलले जात आहे.

गजानन कीर्तीकरांना लोकसभेला तिकीट नाकारलं असलं तरी राज्यसभा आणि विधान परिषदेत संधी देत पुनर्वसन केले जाईल अशी अपेक्षा होती. पण तीही फोल ठरली.शिंदेंनी त्यांना ना राज्यसभा दिली ना विधान परिषद. याचवेळी पक्षात इतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलेल्या नेत्यांचं पुनर्वसन केले जात असतानाच कीर्तीकरांकडे शिंदेंनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.

Gajanan Kirtikar, Eknath Shinde
Vaibhav Naik : 'त्यांनी केलेली टीका झोंबली, पण जेव्हा तुमची मुलं...' वैभव नाईकांनी राणेंना आरसा दाखवला

शिवसेनेचे माजी खासदार राहिलेल्या गजानन कीर्तीकरांना एकनाथ शिंदेंनी पक्षातही तशी फार मोठी जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे पुनर्वसन नाही तर नाही,पण पक्षसंघटनेतही कीर्तीकरांना फार मोठी संधी मिळालेली नाही. हीच खंत कीर्तीकरांना आहे. मात्र,गजानन कीर्तीकर यांची प्रकृतीही तितकीही त्यांना साथ देत नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पक्ष वाढवण्याची दगदग त्यांना कितपत सहन होईल याविषयी साशंकता आहे. त्याचमुळे कीर्तीकरांना शिंदेंकडून कोणतीही जबाबदारीही देण्यात नसल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेनेचा एक सुवर्णकाळ पाहिलेला आणि मुंबईचं राजकारण गाजवलेल्या गजानन कीर्तीकरांनी अचानक राज ठाकरे-उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यासंबंधी एकत्र यावं यावर केलेलं वक्तव्य,अखंड शिवसेनेसंबंधीचं भाष्य, शिंदेंची शिवसेना भाजपप्रणित,अडीच वर्षांत आपल्या अनुभवाचा वापर करुन न घेतल्याची खंत हे जरी रोखठोक भावना असल्यातरी त्यांच्यामागचं दुखणं हे शिंदेंकडून शिवसेनेची मुलखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जात असलेल्या रामदास कदमांना दिलं जात असलेले झुकतं माप हे असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Gajanan Kirtikar, Eknath Shinde
Pooja Khedkar-Vaibhav Sable Case : पूजा खेडकरनंतर सांगलीच्या उपायुक्ताचाही MPSC ला चुना? कर्णबधीर प्रमाणपत्र खोटं, नव्या आरोपानं खळबळ

बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक असलेल्या गजानन कीर्तीकर यांनी शिवसेनेच्या शाखेतून कामाला सुरुवात केली. गजानन किर्तीकर यांनी पक्षात अनेक पदे भूषवली. 1990 साली ते पहिल्यांदा मालाड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. 1990, 1995, 1999, 2004 अशा सलग चारवेळेला ते आमदार झाले. 1995 ते 1998 या काळात गजानन किर्तीकर गृहराज्यमंत्री व पर्यटन राज्यमंत्री होते. 1998 ते 99 या काळात ते नारायण राणे यांच्या कॅबिनेटमध्ये परिवहन मंत्री होते.

बाळासाहेबांची ही शैली गजानन किर्तीकर यांना प्रचंड भावली.त्यामुळे त्यांनी 1966 साली त्यांनी रिझर्व्ह बँकेतील नोकरी सोडून थेट शिवसेनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली. आता त्याच गजानन कीर्तीकरांनी मागचा पुढचा विचार न करता थेट शिंदेंसह शिवसेनेच्या कार्यपध्दतीवरही बोट ठेवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com