राकेश झुनझुनवालांसमोर पंतप्रधान मोदी हात बांधून उभे राहतात तेव्हा...

शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Narendra Modi and Rakesh Jhunjhunwala
Narendra Modi and Rakesh Jhunjhunwala
Published on
Updated on

नवी दिल्ली : शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली असून, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमागील नेमका उद्देश समोर आलेला नसला तरी मोदींनी स्वत: झुनझुनवाला यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मोदी यांनी या भेटीबद्दल ट्विट केले आहे. एकमेवाद्वितीय राकेश झुनझुनवाला यांना भेटून अतिशय आनंद झाला. भारताबद्दल त्यांनी अतिशय महत्वपूर्ण आणि सकारात्मक माहिती दिली, असे मोदींनी म्हटले आहे. या भेटीचा नेमका उद्देश समोर आलेला नाही. परंतु, या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मोदी हे झुनझुनवाला यांच्यासमोर हात बांधून उभे दिसत आहेत. मोदी आणि झुनझुनवाला यांच्या फोटोवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. एका व्यापाऱ्यासमोर मोदी हात बांधून उभे आहेत, अशी टीका काहींनी केली आहे. तर राकेश झुनझुनवाला यांच्यासारखे बना, म्हणजे पंतप्रधान तुमच्यासोबत फोटो काढून शेअर करतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान, जगातील सर्व घडामोडींवर ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखीमपूर खीरीतील घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात एवढा मोठा हिंसाचार होऊनही मोदींनी एकही ट्विट केलेले नाही. याचवेळी रामायण मालिकेत रावणाचे पात्र करणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाबद्दल मात्र, मोदींनी शोक व्यक्त केला आहे. यामुळे मोदींना सोशल मीडियावर अनेक नेटिझन्स प्रश्न विचारू लागले आहेत.

Narendra Modi and Rakesh Jhunjhunwala
मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर दोन महिन्यांतच बोम्मईंची अग्निपरीक्षा

लखीमपूर खीरीत चिरडलेल्या शेतकऱ्यांबद्दलही दोन शब्द बोला, अशी मागणी अनेक नेटिझन्सनी मोदींकडे केली आहे. दरम्यान, मोदी हे काल लखनौमध्ये गेले होते. तेथून केवळ 3 तासांच्या अंतरावर लखीमपूर खीरी आहे. परंतु, मोदींनी लखीमपूर खीरीला भेट तर दिली नाही. याचबरोबर या कार्यक्रमात एकदाही लखीमपूर खीरीतील घटना आणि मृत शेतकऱ्यांबद्दल साधा उल्लेखही मोदींनी केला नाही.

Narendra Modi and Rakesh Jhunjhunwala
पथकात भाजपचे पदाधिकारी? एनसीबीचा अखेर मोठा खुलासा

लखीमपूर खीरीतील घटनेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. तरीही भाजपचे सर्वोच्च नेतृत्व यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर असलेल्या उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेमुळे भाजप नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे. याचा मोठा फटका आगामी निवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप प्रवक्त्यांपासून बडे नेते यावर बोलण्यास तयार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com