औरंगाबाद : शहरातील वाहतुकीची समस्या एकीकडे गंभीर असतानाच खासदार इम्तियाज जलील वाहतुक नियोजनासाठी शुक्रवारी ( ता. एक) रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी वाहतूक अधिकाऱ्यांना वाहतूक नियमन व कारवाईबाबत सूचना दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहरातील रस्ता, पार्कींग, वाहतुक व्यवस्थेबाबत प्रश्न कायम आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून वरवरचे प्रयत्न सुरु असल्याने समस्या अजूनही जटीलच आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. शहरातील वाहतुक समस्या जाणुन घेण्यासाठी त्यांनी विविध भागात पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वाहतूक विभागाचे सहायुक आयुक्त दिनेशकुमार कोल्हे, पोलिस निरीक्षक दादासाहेब सिनगारे सोबत होते. जालना रस्त्यासोबतच जुन्या औरंगाबादमधील वाहतुकीचीही त्यांनी पाहणी केली.
पंचायत समितीसमोरील चौकात अखंड दुभाजक तोडण्याची सुचना त्यांनी केली. तसेच शहागंज भाजी मंडईत पाहणी करुन त्यांनी हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. शहरात पार्किंगचे नियम तोडणारांवर कारवाई करा अशा सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या. तसेच शहरातील काही रिक्षा थांबे खासदारनिधीतून बांधण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात वाहतूक विभाग, महापालिका आणि आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.