Loksabha Election 2024 : जयंत पाटलांकडून होणार कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम'? विद्यमान खासदारांना संघर्ष करावा लागणार

Jayant Patil जयंत पाटील यांचीही या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागल्याने ते ज्याच्या बाजूने असतील, त्याच उमेदवाराला या ठिकाणी मोठे समर्थन मिळण्याची शक्यता आहे.
Raju shetty, Jayant Patil, Dhairyashil Mane
Raju shetty, Jayant Patil, Dhairyashil Manesarkarnama

Kolhapur News : राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मतदारसंघ इस्लामपूर हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील एक भाग आहे. जवळपास शेतकरी वर्गाचा प्रचंड पगडा असलेला हा विधानसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या झोळीत भरभरून मत देणारा हा विधानसभा मतदारसंघ आहे. राज्याच्या सत्ता नाटकाचा प्रयोगानंतर मतदारसंघावर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत अजूनतरी जयंत पाटील असल्याने कल महाविकास आघाडीकडे आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांचा पंधरा वर्षांपासून या मतदारसंघात संपर्क आहे, मागील 7 वर्षांत रयत क्रांती संघटना काढून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला धक्का दिला. यंदा मात्र खासदार धैर्यशील माने यांना स्थानिक पातळीवरील जयंत पाटील यांच्या पारंपरिक विरोधकांना हाताशी धरून वाटचाल करावी लागेल. लोकसभेला ऊसदराच्या मुद्द्यावर मतदान करणारा मतदारसंघ आहे. येथे जयंत पाटील यांचे मोठे प्राबल्य आहे. शेट्टींचे बोटावर मोजण्याइतपतच उघड कार्यकर्ते आहेत. तरीही शेट्टींना या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत विरोधी उमेदवारापेक्षा जादा मतदान झाले आहे.

या मतदारसंघात विधानसभेला जयंत पाटील व लोकसभेला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्याला कौल व्यक्त केला जातो, असे चित्र राहिले आहे. गेल्या निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव झाला असला, तरी या मतदारसंघात शेट्टी पुढे राहिले. त्यामुळे येथे पक्षीय गणिते उपयोगाला येत नाहीत. या वेळी राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांची फाटाफूट झाली आहे. शिवसेनेचे मर्यादित नेटवर्क असल्याने कार्यकर्त्यांची कमतरता आहे. तरीही धैर्यशील माने यांनी शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात निधी देऊन बॅकलॉक भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Raju shetty, Jayant Patil, Dhairyashil Mane
Raju Shetti : महाविकास आघाडीला गळ पण प्रतिसाद नाहीच! आता इरादा पक्का, राजू शेट्टी म्हणाले...

मानेंना भाजप, शिवसेना शिंदे गट, महाडिक गट, सदाभाऊ खोत यांच्या साथीनेच इथे लढावे लागेल. त्यांचा वैयक्तिक संपर्क कमी आहे. त्यातच जयंत पाटील यांच्या विरोधकांमध्ये राजू शेट्टी यांच्याविषयी असलेला पूर्वीपासूनचा जिव्हाळा हा मुद्दाही निर्णायक असेल. त्यामुळे धैर्यशील माने यांना इस्लामपूर मतदारसंघात मोठी कसरत करावी लागेल. जयंत पाटील यांचीही या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागल्याने ते ज्याच्या बाजूने असतील, त्याच उमेदवाराला या ठिकाणी मोठे समर्थन मिळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न हा महत्त्वाचा मुद्दा

या मतदारसंघात ठाकरे, शरद पवार गट कोणाच्या बाजूला असणार, याबरोबरच ऊसपट्टा असल्याने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना झालेली मदत व त्यांच्याविषयी उठवलेला आवाज यावर इथला मतदार विचार करून आपले मत ठरवतो. हा मतदारसंघ जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असल्यामुळे ते या मतदारसंघात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भाजपसोबत जाण्याच्या चर्चा जोर धरू लागली आहे, तर त्यांच्या पुत्राच्या प्रवेशावरूनच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीचे घोडे आणले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यातही काही तथ्य नसल्याचा एक मतप्रवाह आहे. येत्या काळात यात काही बदल झाल्यास महायुतीला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. मात्र, जयंत पाटील निर्णय काय घेणार याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्यातरी महाविकास आघाडीचे पारडे या मतदारसंघात जड आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Raju shetty, Jayant Patil, Dhairyashil Mane
Jayant Patil On Nilesh Lanke: नीलेश लंकेंच्या प्रश्नावर जयंत पाटलांचे मिश्किल उत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com