Latur Shivsena Leader Crime : न्यायालयाने उपजिल्हाप्रमुखाच्या कानशिलात लगावली, आवाज पक्षप्रमुखांपर्यंत जाईल का?

Court sentenced to Latur Shivsena Leader : शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखाला न्यायालयाने नुकताच 10 वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला आहे. शिक्षा ठोठावली त्यावेळीही तो उपजिल्हाप्रमुख या पदावर होता. राजकीय पक्षांमध्ये इतका बेमुर्वतपणा येतो कसा, हा महत्वाचा प्रश्न आहे.
Latur Shivsena Leader Vikas Jadhav
Latur Shivsena Leader Vikas Jadhavsarkarnama
Published on
Updated on

Latur Shivsena Leader Vikas Jadhav get punished : राजकारणात योग्य -अयोग्य, नैतिकता, विधिनिषेध हे शब्द बाजूला पडले आहेत. नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता किती उपयुक्त आहे, हे सर्वात म्हत्वाचे आहे, मग त्याच्यावर कितीही गंभीर गुन्हे दाखल असले तरी राजकीय पक्षांना त्याचे काही वाटत नाही. गांभीर्य बाजूला ठेवून केवळ मनोरंजनाला प्राधान्य देणाऱ्या समाजालाही त्याचे आता फारसे काही वाटत नसल्याचे चित्र आहे. त्यातूनच धक्कादायक प्रकार घडतात.

एका गंभीर प्रकरणात एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या लातूर उपजिल्हाप्रमुखाला न्यायालयाने 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हा गुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येचा असून, आरोपी आहे शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख विकास जाधव. जाधव याने या अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याचा आरोप होता. तो दोषी असल्याचे सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली, तोपर्यंत तो पक्षाच्या संघटनात्मक पदावर होता. शिवसेना फुटली त्यावेळी हा पदाधिकारी शिंदे गटात आला. हा गुन्हा 2020 मध्ये दाखल झालेला होता.

Latur Shivsena Leader Vikas Jadhav
Latur Crime : न्यायालयाचा शिंदेंच्या मराठवाड्यातील शिवसेना नेत्याला मोठा झटका; अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी 10 वर्षांचा कारावास

लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. लग्नाचे आमिष दाखवून शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख विकास जाधव याने त्या अल्पवयीन मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवले होते. नंतर मात्र त्याने लग्न करण्यात नकार देत मुलीला तिच्या घरी जाऊन धमक्या द्यायला सुरुवात केली. माझा नाद सोड अन्यथा, तुझ्या अख्ख्या कुटुंबाला मारून टाकीन, अशी ती धमकी होती. त्यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने 2 सप्टेंबर 2020 रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

घटनात्मक पदावर किंवा पक्षाच्या संघटनात्मक पदावर असले की नेत्यांच्या अंगी एकप्रकारची गुर्मी येते. त्यातूनच हा प्रकार घडला आणि बदनामीच्या भीतीपोटी अल्पवयीन मुलीला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. उदगीरच्या विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला चपराक लगावली आहे, त्याचा आवाज शिवसेनेच्या(Shivsena) प्रमुख नेत्यांच्या, अन्य पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या कानांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड झालेला हा उपजिल्हाप्रमुख जिल्हा नियोजन समितीचा माजी सदस्य आहे, अशीही माहिती आहे.

Latur Shivsena Leader Vikas Jadhav
CM Devendra Fadnavis : 'कोणीही असो प्रत्येकावर कारवाई होणारचं' ; फडणवीस यांचा बीडमधून इशारा

सत्ताधारी पक्षाचा, त्यातही शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख असल्याचा गैरफायदा जाधव याने घेतला. त्याच्या बळावरच पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांना धमकावण्यापर्यंत त्याची मजल गेली. हे सर्व सुरू असताना शिवनेसेनेचे वरिष्ठ नेते काय करत होते, त्यांना हे प्रकरण माहीत नव्हते, का असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जितके गुन्हे जास्त, तितके शिवसेनेत अधिक वजन असे समजले जाते, मात्र ते गुन्हे आंदोलनाचे, लोकांच्या समस्या सोडवताना लढताना दाखल झालेले असले पाहिजेत. या उपजिल्हाप्रमुखाने त्याचा वेगळाच अर्थ घेतल्याचे दिसत आहे.

अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जाधव हा शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदावर कसा राहिला, याचे उत्तर पक्षाच्या प्रमुखांना द्यावे लागणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जाधव याला अटकही झाली होती. त्यावेळी अविभाजित असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांच्या लक्षात ही बाब आली नसेल का? समाजहिताच्या, विकासाच्या मोठमोठ्या, फुकाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांना लोक जाब विचारणार आहेत, अशी अपैक्षा करणे गैरलागू झाल्याचा सध्याचा काळ आहे. लोकांनाच काही वाटत नाही तर आपल्याला काय, अशी भावना नेत्यांची झालेली असणार. त्यातूनच असे प्रकार घडत आसावेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com