Lok Sabha 2024 Kolhapur North: भाजप-सेनेची मतं निर्णायक, पण 'या' कारणामुळे राहील राजकीय बेरजेचे आव्हान

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत Lok Sabha Election निर्णायक भूमिका पार पाडणाऱ्या मतदारसंघात कोल्हापूर Kolhapur उत्तर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
Lok Sabha Election 2024  खासदार धनंजय महाडिक, छत्रपती शाहू महाराज, सजेत पाटील
Lok Sabha Election 2024 खासदार धनंजय महाडिक, छत्रपती शाहू महाराज, सजेत पाटीलसरकारनामा ब्युरो
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ तसा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश साळोखे यांच्यानंतर काँग्रेसने मालोजीराजे छत्रपती यांच्या रूपाने उत्तरवर विजय मिळवला. मात्र, त्यानंतरच्या दोन विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे Shivsena राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने हा गड ताब्यात घेतला. त्यामुळे कोल्हापूर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.

मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत Lok Sabha Election 2024 आमदार सतेज पाटील यांनी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधवांना उमेदवारी देऊन काँग्रेसचा Congress झेंडा फडकवला. पोटनिवडणुकीतदेखील त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना विजयी करून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावार आमदार पाटील यांनी कब्जा केला. Lok Sabha Election 2024 Kolhapur North Constituency fight within Congress Shivsena

त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत Lok Sabha Election निर्णायक भूमिका पार पाडणाऱ्या मतदारसंघात कोल्हापूर Kolhapur उत्तर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. कारण शिवसेनेचा Shivsena बालेकिल्ला पुसून काँग्रेसचा बालेकिल्ला करण्याचा प्रयत्न सतेज पाटील यांनी केला आहे. शिवाय शिवसेनेत झालेले दोन गट, आमदार सतेज पाटलांची पकड या मतदारसंघावर अधिक आहे. त्यात छत्रपती घराण्यातील शाहू महाराज यांच्या रूपाने उमेदवार मिळाल्याने माजी आमदार मालोजीराजें यांचे कार्यकर्ते आता प्रचाराच्या रिंगणात आहेत.

या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही तुल्यबळ आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघात संपूर्ण शहरी मतदार असून, सर्वच सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असणारा मतदार आहे. आमदार सतेज पाटील SateJ Patil यांचे महापालिकेतील नगरसेवक, शिवाय ठाकरे गटाचे कार्यकर्ते, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आणि शाहू महाराज यांना मानणारा मोठा वर्ग उत्तर विधानसभा मतदारसंघात आहे.

हेदेखील वाचा -

Lok Sabha Election 2024  खासदार धनंजय महाडिक, छत्रपती शाहू महाराज, सजेत पाटील
Shahu Maharaj Chhatrapati : काँग्रेसकडून कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

सेनेतल्या फुटीचा लाभ महायुतीला मिळेल?

तर महायुतीकडून खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नगरसेवक, खासदार संजय मंडलिक यांना मानणारे कार्यकर्ते आणि 2019 च्या पोट निवडणुकीतील भाजपचे सत्यजित कदम हे चेहरे निवडणुकीच्या प्रचारासाठी रिंगणात आहेत.

२०१९ च्या विधानसभा व त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार व माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मनावर घेतले तर काय होऊ शकते, याची प्रचिती आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात सद्यःस्थितीत महायुतीला मताधिक्य मिळवणे आव्हान असेल. शिवसेनेचे निष्ठावान मतदार या मतदारसंघात आहेत. पण, सेनेतील फुटीमुळे त्यांची विभागणी झाली.

याचा लाभ महायुतीला मिळेल का नाही, याविषयी संभ्रमावस्था आहे. मात्र, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षानेही ७८ हजार मते घेऊन आपली ताकद या मतदारसंघात आजमावली आहे. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजप सोबत नव्हती. 78 हजार मते घेऊन भाजपने आपली बाजू भक्कम केली आहे. मात्र, लोकसभेत मात्र शिवसेनेचा एक गट आणि राष्ट्रवादीचा Nationalist Congress Party प्रबळ गट महायुतीत आहे. त्यामुळे महायुतीला या ठिकाणी 60 टक्के मते मिळवणे शक्य आहे.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे नाव का आले पुढे

याचेच गणित काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी करून सर्वसमावेशक चेहरा म्हणून श्रीमंत शाहू महाराज यांचे नाव समोर आणले आहे. मतदारांशी शाहू महाराज यांचा संपर्क नसला तरी कोल्हापूर शहरात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. महायुतीतील मतविभागणी करायची झाल्यास शाहू महाराज हे सक्षम पर्याय ठरतील, असा अंदाज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह सतेज पाटलांना आहे.

शिवसेना व भाजप यांचा पारंपरिक मतदार या विधानसभा मतदारसंघात आहे. कसबा बावडा आणि पेठांमध्ये काँग्रेसचाही पारंपरिक मतदार आहे. महिला मतदारांची संख्याही अधिक असून, त्यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटी मतदारांपर्यंत कशी गेली, यावर निकाल अवलंबून असणार आहे.

हेदेखील वाचा -

Lok Sabha Election 2024  खासदार धनंजय महाडिक, छत्रपती शाहू महाराज, सजेत पाटील
Sanjay Mandlik News : संजय मंडलिक कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर ठाम!

शहरी नवमतदारही खास तरुण वर्गात हिंदुत्व या मुद्द्याला घेऊन प्रचंड क्रेज आहे. एकीकडे महाविकास आघाडीची फौज रस्त्यावर उतरली असताना दुसरीकडे महायुतीने हाचे राखून ठेवलेत ही परिस्थिती मतदारसंघातील आहे. त्यामुळे या मतदारसंघात आघाडी आणि युती दोन्ही पक्षांची लढत तुल्यबळ आहे.

अलीकडच्या काळात कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांचा विचारापासून दूर नेण्याचा प्रयत्न काही जातीय पक्ष करत आहेत, तर तरुण वर्गात हिंदुत्वाबाबत प्रचंड आस्था निर्माण झाली आहे. पण जुन्याजाणत्या मतदारांना राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची जाण आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोणाची सरशी होईल, ही उत्सुकता आहे.

ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न

या मतदारसंघात सुशिक्षित मतदारांसह अल्पसंख्याक व दलित मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणाचे वर्चस्व असणार हे काही दिवसांत स्पष्ट होईल.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com