Manisha Kayande News : भावना गवळींमुळे विधान परिषदेची पुन्हा संधी हुकलेल्या कायंदेंच्या पुनर्वसनासाठी आता शिंदे काय डाव टाकणार ?

Eknath Shinde Shivsena Politics : मित्रपक्ष भाजपने देखील बीडमधून पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करत त्यांना विधान परिषदेची संधी दिली आहे.त्यामुळे कायंदेंच्या पुनर्वसनासाठी शिंदे काय डाव टाकणार याविषयी चर्चा जोर धरू लागली आहे.
Manisha Kayande and Eknath Shinde
Manisha Kayande and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाकडून 2018 ला विधान परिषेदेवर आमदार म्हणून गेलेल्या मनीषा कायंदे यांनी गेल्या वर्षी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.पक्षात धुसमट होत असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटाची वाट धरली होती.

कायंदे (Manisha Kayande) यांची विधान परिषदेची मुदत 4 जुलै रोजी संपली आहे. त्यामुळे कायदेंना विधान परिषदेवर पुन्हा पाठवले जाणार असल्याची चर्चा होती.पण भावना गवळींना शिंदे गटाकडून ती संधी देण्यात आल्यामुळे कायंदेंचा पत्ता कट झाला.

त्यामुळे 2012 ला भाजपमधून शिवसेनेत आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कायंदेंना अगोदर शिवसेनेच्या प्रवक्त्या केलं. त्यांना 2018 ला आमदारकीची संधी दिली होती.पण 2023 मध्ये ठाकरें ना धक्का देत शिंदेंची साथ सोडत कायंदेंनी शिंदेंची साथ देण्याचा मोठा निर्णय घेतला. आता सध्यातरी 'वेट अॅण्ड वॉच' अशीच आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) माजी आमदार शिवसेनेच्या धडाडत्या तोफ नेत्या मनीषा कायंदेंचं पुनर्वसन कसं करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.कारण लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार असताना भावना गवळी यांना तिकीट नाकारलं होतं. त्यानंतर आता त्यांना शिंदे गटाकडून विधान परिषदेवर संधी देत त्यांचं पुनर्वसन करण्यात येत आहे.

तसेच मित्रपक्ष भाजपने देखील बीडमधून पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करत त्यांना विधान परिषदेची संधी दिली आहे.त्यामुळे कायंदेंच्या पुनर्वसनासाठी शिंदे काय डाव टाकणार याविषयी चर्चा जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेतून 4 जुलै 2024 रोजी 15 आमदार निवृत्त झाले आहेत.विलास पोतनीस कपिल पाटील महादेव जानकर, मनीषा कायंदे,भाई गिरकर,बाबाजानी दुर्राणी, नीलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील,वजाहत मिर्झा,प्रज्ञा सातव, शेकापचे जयंत पाटील यांसारख्या आमदारांचा समावेश होता.

आता यामधील तीन आमदार पुन्हा एकदा निवडणूक जिंकून सभागृहामध्ये परतले आहेत, तर दोन आमदार आगामी विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात असणार आहे.यात अनिल परब, निरंजन डावखरे आणि किशोर दराडे यांनी निवडणूक जिंकली आहे.प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील हे विधान परिषदेने निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.

Manisha Kayande and Eknath Shinde
BJP News : पक्षांतर्गत ऑपरेशनला भाजपची सुरुवात; पश्चिम नागपूर मतदारसंघातील बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख यंत्रणा बरखास्त

शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडाआधी मनीषा कायंदे या उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) बाजू समर्थपणे लढवत होत्या.पण त्यांनी बंडानंतर एक वर्षांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर बाहेरून आलेले लोक पक्षात वरचढ ठरत आहेत,जुन्या लोकांची पक्षात घुसमट होत होती,असं कारण त्यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचे सांगितले होते.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना मनिषा कायंदे म्हणाल्या होत्या,मी शिवसेनेत 2012 मध्ये प्रवेश केला होता. पक्षाने मला विधान परिषदेवर संधी दिली होती.मी पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली होती.पण पक्ष सोडण्याचा बदल आता का झाला याला काही कारण आहे. शिंदेंच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे.त्यांच्यावरील टीकेला त्यांनी कामातून उत्तर दिलं.आज महाराष्ट्रात ज्या वेगाने काम सुरू आहे,ते काम त्यांनी केलं आहे.

दुसरीकडे,उद्धव ठाकरेंनी पक्षाची पुनर्बांधणी केली नाही. किंवा आत्मपरिक्षणही केलेलं नाही," अशी टीकाही कायंदे यांनी त्यावेळी केली होती.तसेच जर आम्हाला पक्षप्रमुखांशी बोलताना अडचण येत असेल, आमचं ऐकलं जात नसेल, कार्यकर्त्यांकडून पैसे उकळण्यात येत असतील, तर ती बाळासाहेबांची शिवसेना नाही. बाळासाहेबांची शिवसेना इथे आहे असा कौतुकाचा वर्षाव करत त्यांनी शिंदे गटात पाऊल ठेवलं होतं.

Manisha Kayande and Eknath Shinde
Maratha Reservation News : छत्रपती संभाजीनगरात शनिवारी धडकणार मराठ्यांचे वादळ; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी!

पण गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटातही मनीषा कायंदे या सक्रिय झाल्या आहेत . राजकीय वर्तुळात त्या शिंदे गटाची बाजू भक्कमपणे मांडत असल्याचेही निदर्शनास आलेले आहेत. त्यामुळे शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनीषा कायंदे यांचं पुनर्वसन आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसं करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Manisha Kayande and Eknath Shinde
Rajan Salavi News : राजन साळवींचे उदय सामंतांना ओपन चॅलेंज; म्हणाले '...तर राजकीय संन्यास घ्या !'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com