Shivsena News : शिवसेना-राष्ट्रवादीला दाबत भाजपने काबीज केली 5 सत्तास्थाने : मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत उधळला वारू

Political News : भाजपने सत्ता स्थापन करीत असताना मोठी बाजी मारली असून मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दूर सारले असल्याचे चित्र आहे.
eknath shinde Devendra Fadnavis
eknath shinde Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील 12 जिल्हा परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यानंतर या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळवले आहे. मात्र, याठिकाणी भाजपने सत्ता स्थापन करीत असताना मोठी बाजी मारली असून मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दूर सारले असल्याचे चित्र आहे. भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बाजूला सारत 5 सत्तास्थाने काबीज केली. त्यामुळे मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वारू उधळल्याचे चित्र समोर आले आहे.

भाजपने महायुतीमधील मित्र पक्षाला बाजूला सारत 5 सत्तास्थाने काबीज केली आहेत. त्यामुळे राज्यातील ही सत्तास्थाने कोणते हे जाणून घेऊयांत.

संभाजीनगर जिल्हा परिषद :

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांनी मिळून भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा रचलेला डाव वेळीच ओळखला. ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांच्या जीवावर शिवसेनेने अध्यक्षपदावर आपला उमेदवार बसवण्याची तयारी केली होती त्याच ठाकरे गटाच्या सदस्यांना आपल्या बाजूने फिरवत शिंदेसेनेची पुरती फजिती केली. भाजपच्या विरोधात गुप्तपणे केलेले कांड उघड झाल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही बॅकफूटवर जावे लागले.

eknath shinde Devendra Fadnavis
Maharashtra News Live Update : बागेश्वरधामच्या धीरेंद्रशास्त्रीचं 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'च्या श्याम मानव यांना थेट आव्हान

मित्रपक्षाशी गद्दारीचा प्लॅन उघड झाल्यानंतर नाचक्की झालेल्या शिंदेंच्या शिवसेनेला मग अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून थेट माघारच घेतली. या सगळ्या खेळीमध्ये धुरंदर ठरले ते राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे. अर्थात त्यांना गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, फुलंब्रीच्या अनुराधा चव्हाण या आमदार जोडीची भक्कम साथ मिळाली.

शिवसेनेसह उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या जिल्ह्यातील आमदारांनी दाखवलेली एकजूट वाखाणण्याजोगी होती. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडे 21- 22 सदस्यांचे संख्याबळ असतानाही उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या भरोशावर घेतलेली जोखीम आणि शिंदेंनी खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे व अब्दुल सत्तार या त्रिकूटावर सोपवलेली जबाबदारी त्यांना वैयक्तिक स्वार्थापोटी नीट पार पाडता आली नाही. त्यामुळे याठिकाणी भाजपने टाकलेला डाव कामी आला.

eknath shinde Devendra Fadnavis
Maharashtra Politics Update : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

परभणी जिल्हा परिषद :

परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तडजोड करावी लागली. सर्वाधिक जागा जिंकत जिल्हा परिषदेत एक नंबरचा पक्ष ठरल्यानंतर पालकमंत्री बोर्डीकर यांनी सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दूर ठेवत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हाताशी धरून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला.

शिवसेनेच्या वाट्याला जेमतेम पाच जागा मिळाल्या असताना केवळ राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील आमदार राजेश विटेकर, माजी आमदार विजय भांबळे या कट्टर विरोधकांना तोंड वर न काढून देण्यासाठी बोर्डीकर यांनी शिवसेनेला सत्तेत घेण्याचे ठरवले. मेघना बोर्डीकर यांच्या या स्थानिक वर्चस्वाच्या राजकारणात संख्याबळ नसतानाही शिवसेना सत्तेत बसणार हे राज्यातील वरिष्ठ नेत्यांना पटले नाही. तेव्हा बोर्डीकर यांच्या महत्त्वकांक्षेपेक्षा पक्षाच्या वर्चस्वाला महत्त्व देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोर्डीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेण्याच्या सूचना दिल्या. बोर्डीकर यांनी आपल्या इच्छा,आकांक्षांना मुरड घालत पक्षादेश शिरसावंद मानत राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली.

eknath shinde Devendra Fadnavis
Maharashtra Politics Live Update : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल, महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार

सातारा जिल्हा परिषद :

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्कादायकरित्या भाजप उमेदवार प्रिया शिंदे यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी भाजपचेच राजू भोसले विजयी झाले. शेवटच्या क्षणी सभागृहात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फुटल्याने बहुमत नसतानाही भाजपच्या प्रिया शिंदे यांचा विजय झाला. याठिकाणीही भाजपने एकनाथ शिंदे यांच्या सेनेला बाजूला सारत विजय मिळवला.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास बाकी असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र ही निवडणूक लढणार असल्याची घोषणा मंत्री शंभुराज देसाईंनी केली होती. भाजपला बाजूला ठेवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले होते. पण मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांना फोडत ऑपरेशन लोटस यशस्वी करून दाखवले. त्यामुळे महायुतीमधील मित्र पक्षाला मोठा धक्का याठिकाणी बसला.

eknath shinde Devendra Fadnavis
Operation Lotus : महाराष्ट्राच्या राजकारणात आठ दिवसांत मोठा भूकंप होणार! काँग्रेसच्या बड्या नेत्याचे खळबळजनक भाकीत, आता कोणता पक्ष फुटणार ?

गोकुळ दूध संघ :

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या सुरू झालेल्या राजकारणाचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले आहेत. महायुतीतील घटक पक्षांमध्ये जुंपली असताना जिल्हा बँकेच्या निमित्ताने दोन कट्टर राजकीय विरोधकांच्या दुश्मनीला सॉफ्ट कॉर्नर मिळत आहे. गोकुळ दूध संघाच्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या आहेत. त्यामुळे याठिकाणाहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गोकुळ दूध संघापासूनही दूर ठेवण्याच्या हालचाली सुरु असल्याचे दिसते. तर दुसरीकडे गोकुळमध्ये सुरु असलेल्या घटनानी महायुतीत असूनही महाडिक गटाचे मुश्रीफ शत्रू असा समज निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या गोकुळच्या निवडणुकीत काय होणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

eknath shinde Devendra Fadnavis
Maharashtra News Live Update : बागेश्वरधामच्या धीरेंद्रशास्त्रीचं 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'च्या श्याम मानव यांना थेट आव्हान

ऑलिम्पिक असोसिएशन :

ऑलिम्पिक असोसिएशनसारख्या क्रीडा संघटनांमध्येही राजकीय प्रभाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाढती जवळीक लक्षात येत असून, या समीकरणात शिवसेनेला बाजूला पडल्याची चर्चा रंगली आहे. ही घडामोड केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नसून, राज्यातील व्यापक राजकीय समीकरणांचाही भाग मानली जात आहे. संघटनांवरील नियंत्रण, निवडणुका आणि पदाधिकारी निवडी यामध्ये राजकीय ताकद महत्त्वाची ठरत असल्याने हा ‘पॉवर प्ले’ अधिकच चर्चेत आला आहे.

eknath shinde Devendra Fadnavis
Maharashtra News Live Update : बागेश्वरधामच्या धीरेंद्रशास्त्रीचं 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'च्या श्याम मानव यांना थेट आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com