Kabutarkhana Ban : जैन-गुजराती समाजाचा मुंबईत दबदबा... भाजपचा कबुतरखान्यावरील यु-टर्न महापालिकेची निवडणुकही फिरवणार?

Kabutarkhana Ban : मुंबईत जैन समाजाची 4 टक्के आणि गुजराती समाजाची 19 टक्के लोकसंख्या आहे. याचमुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपवर टाकला जात आहे. कबुतरखाने बंद ठेवण्याच्या विरोधातील आंदोलनही याचमुळे होत आहे.
Jain and Gujarati communities protest against Kabutarkhana closure in Mumbai ahead of civic polls.
Jain and Gujarati communities protest against Kabutarkhana closure in Mumbai ahead of civic polls. Sarkarnama
Published on
Updated on

Kabutarkhana Ban : मुंबईत कबुतरखाने बंद करण्याचा वाद प्रचंड चिघळला आहे. जैन समाज कबुतरखाने सुरु ठेवा म्हणून रस्त्यावर उतरला आहे. मुंबईतल्या कबुतरखान्यांमध्ये जाऊन त्यांना नियमित दाणापाणी करणं ही जैन आणि गुजराती समाजाची परंपरा आहे. यातून पुण्य मिळते अशी या समाजाची धार्मिक आस्था आहे. तर मराठी एकीकरण समितीने कबुतरखाने बंदच ठेवावे म्हणून समर्थनार्थ आंदोलन सुरु केले आहे.

यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर राज्य सरकार आणि महापालिकांनी सावध आणि जैन-गुजराती समाजाला पुरक भूमिका घेतली. सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता कबुतरांना खाद्य घालण्यात यावे अशी सरकारने भूमिका मांडली. तर पालिकेनेही सकाळी 6 ते 8 खाद्य देण्याचं विचाराधीन आहे, असे म्हंटले. यापूर्वी राज्य सरकारनेच कबुरतखाने बंद करण्याची घोषणा केली होती.

या कबुतरखान्यांमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यानंतरही भूमिका बदलल्याने राज्य सरकार जैन आणि गुजराती समाजाच्या आंदोलनापुढे नमले असल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणूक आणि मुंबईमध्ये असलेला जैन-गुजराती समाजाचा दबदबा यामुळे सरकारने यु-टर्न घेतल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईत जैन आणि गुजराती समाजाचा दबदबा :

जैन समाजाची देशातली लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 0.4 टक्के आणि मुंबईत 4 टक्के आहे. गुजराती समाज मुंबईत 19 टक्के आहे. मूळचा व्यापारी असलेल्या या समाजाच्या हातात मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती एकवटली गेली आहे. मुंबईत घाटकोपर, माटुंगा, मुलूंड, गोरेगाव, कांदिवली भागामध्ये या समाजाची मोठी वस्ती आहे.

मुंबईत आणि उपनगरात उभ्या राहणाऱ्या टॉवरचे काम सुरु होण्यापूर्वी तिथे जैन मंदिरांची पायाभरणी होते. मराठी किंवा मांसाहार खाणाऱ्यांना घर विकले जाणार नाही, असा तिथे अलिखित नियम असतो. मुंबईतील काळबादेवीपासून दादरपर्यंत आणि घाटकोपरपासून मालाडपर्यंतच्या बाजारपेठा या वर्गाच्या हातात आहे.

Jain and Gujarati communities protest against Kabutarkhana closure in Mumbai ahead of civic polls.
Kabutarkhana Ban : कबूतरांखान्यांनी मुंबई तापवली : मराठी विरुद्ध जैन-गुजराती वादाला 'दाणे'

याच जोरावर अनेकदा त्यांच्याकडून अलिकडच्या काळात पर्युषण काळात मटणाची दुकाने, कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी पुढे येत असते. आता कबुतरखाने बंद ठेवण्याच्या विरोधातील आंदोलनही याच दबदब्यातून जन्माला आल्याचे बोलले जाते. हीच मतदारसंख्या आणि महापालिकेतील स्थानिक मतदान विभागणी लक्षात घेत भाजप आणि शिवसेनेसाठी जैन-गुजराती समाज महत्वपूर्ण झाला आहे.

Jain and Gujarati communities protest against Kabutarkhana closure in Mumbai ahead of civic polls.
Kabutarkhana Ban : मोठी बातमी : कबुतरांना खाद्य देण्यास परवानगी देणार? जैन-गुजराती समाजाच्या आंदोलनांनंतर फडणवीस सरकारचा हायकोर्टात यु-टर्न

जैन-गुजराती समाज भाजपची व्होट बँक :

ठाकरे बंधू एकत्रित आल्यास एकगठ्ठा मराठी मते पारड्यात पडतील, असे सांगण्यात येत असले तरी ते शक्य नाही. मुंबईतील 38 टक्के मराठी मतांपैकी 12 ते 15 टक्के मते भाजपला मिळू शकतात. तेवढीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळू शकतात. 4 ते 5 टक्के मते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि 4 ते 5 टक्के मते काँग्रेसला मिळू शकतात.

अशावेळी भाजपला जैन आणि गुजराती मते गेमचेंजर ठरू शकतात. जैन आणि गुजराती समाज ही भाजपची हक्काची व्होट बँक आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच या एकगठ्ठा मतदारांना नाराज करणे भाजपला परवडणारे नाही. न्यायालयाचा आदेश असला तरीही काही ना काही करून उपाय शोधून कबुतरांना खाद्य द्यायला परवानगी द्यावीच लागेल. त्यामुळेच सरकारने भूमिका बदलल्याची चर्चा सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com