एनसीबीची टीम पुन्हा मुंबईत; आज घडणार मोठ्या घडामोडी

एनसीबीने उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली आहे.
Sameer Wankhede and Gyaneshwar Singh
Sameer Wankhede and Gyaneshwar Singh File Photo
Published on
Updated on

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांच्या चौकशीसाठी एनसीबीने उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग (Dnyaneshwar Singh) यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली आहे. या समितीने काही दिवसांपूर्वी वानखेडे यांच्यासह अन्य काही जणांची चौकशी केली आहे. या प्रकरणात आज मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

एनसीबीची हे पथक सोमवारी पुन्हा मुंबईत दाखल झाले आहे. या टीमकडून साक्षीदार प्रभाकर साईलसह इतर साक्षीदारांची चौकशी केली जाणार असल्याचे शक्यता आहे. प्रभाकरला काही दिवसांपूर्वीच नोटीस पाठवल्याचा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. तो न आल्याने एनसीबीने मुंबई पोलिसांनाही पत्र लिहिलं होतं. आज प्रभाकर चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

Sameer Wankhede and Gyaneshwar Singh
वानखेडेंच्या मेव्हणीवर ड्रग्ज प्रकरणात गुन्हा? मलिकांच्या ट्विटने खळबळ

ड्रग्ज प्रकरणातील खंडणीचा प्रकार प्रभाकर साईलच्या आरोपानंतरच पुढे आला आहे. त्यामुळे प्रभाकरचा जबाब महत्वाचा मानला जात आहे. प्रभाकरने याबाबत एक अॅफिडेव्हिटही तयार केले आहे. त्यामुळे प्रभाकरच्या चौकशीनंतर एनसीबी कोणते पाऊल उचलणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच के. पी. गोसावी, सॅम डिसोझा, मनिष भानूशाली यांचे जबाबही महत्वपूर्ण आहेत. ज्ञानेश्वर सिंग यांनीही गरजेनुसार प्रत्येकाला बोलवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, एकूण सहा प्रकरणांचा तपास मुंबई एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून शुक्रवारी (ता. ५ नोव्हेंबर) काढून घेण्यात आला आहे. त्याची घोषणा होऊन २४ तास उलटण्यापूर्वीच दिल्ली एनसीबीची टीम आर्यन खान प्रकरणाच्या तपासासाठी दिल्लीवरून अमली पदार्थविरोधी (एनसीबी) विशेष चौकशी पथक शनिवारी (ता. ६ नोव्हेंबर) मुंबईत दाखल झाले. या टीमने सहा प्रकरणांचा तपास सुरूही केला आहे.

आर्यन खान प्रकरण आणि इतर पाच प्रकरणांचा तपास ‘एनसीबी’च्या मुंबई विभागाकडून काढून घेण्यात आला आहे. यात नवाब मलिक यांचे जावई समीर खान आणि अरमान कोहली यांच्या प्रकरणांचाही समावेश आहे. वानखेडे यांच्यावर आर्यन खानप्रकरणी झालेले गंभीर आरोप बघता ‘एनसीबी’ने या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडून काढून घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला होता. ‘एनसीबी’चे उपमहासंचालक संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे पथक पुढील तपास करणार आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास काढून घेतल्याचा इन्कार वानखेडे यांनी केला होता. मी स्वतःहून आपल्याकडून तपास काढून घेण्याची विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामुळे माझ्याकडून हा तपास काढून घेतला नाही तर माझ्या विनंतीनुसार तो दुसऱ्याकडे दिल्याचे स्पष्टीकरण वानखेडे यांनी दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com