

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढत होत आहे. सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) पथकाने देशमुखांशी संबंधित कंपन्यांवर छापे मारले होते. या कॉलेजवर छापा घातला. या कंपन्यांना कर्ज देताना नियम पायदळी तुडवण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे या कंपन्यांना कर्ज मिळवून देण्यास मदत करणारे आता ईडीच्या रडारवर आले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिरसिंह याच्या तक्रारीनंतर ईडीने १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांचा स्वतंत्र तपास सुरू केला आहे. या प्रकरणात ईडीने देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या अटक केली आहे. ईडीने या प्रकरणात इतरही बाबी तपासण्यास सुरूवात केली आहे. ईडीने देशमुखांशी संबधित कंपन्यांवर काही दिवसांपूर्वीच छापे टाकले होते. यात संबधित कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज देताना नियम पायदळी तुडवले गेल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणात कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करणारे आता ईडीच्या रडारवर आले आहेत. देशमुखांना कर्ज स्वरूपात मिळालेली रक्कम ही ज्या कंपन्यांच्या खात्यावर जमा झाली, त्यावर देशमुखांच्या कुटुंबीयांचा मालकी हक्क आहे. कंपन्यांच्या झाडाझडतीत काही कंपन्या खऱ्या तर काही कंपन्या बोगस असल्याचे समोर आले आहे. या बोगस कंपन्याच्या खात्यावर जमा झालेल्या पैशांचे पुढे काय झाले, त्या पैशांचाउपयोग कुठे करण्यात आला, याचा तपास आता ईडी करत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
देशमुख आणि त्यांच्या मुलाला ईडीने चौकशीसाठी बोलविले होते. मात्र याबाबत देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने अनेक वेळा समन्स बजावूनही ते हजर राहिलेले नव्हते. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या हे देशमुख हे फरार असल्याचा आरोप करत आहेत. ईडी ही कायद्यानुसार चौकशी करत नसल्याचा आक्षेप देशमुख यांच्या वकिलांनी घेतला आहे. चौकशीला सहकार्य करूनही ईडी वारंवार त्रास देत असल्याची भूमिका देशमुख यांनी घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.