
New Delhi News : एकीकडे बिहारची विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा दोन वर्षे बाकी असतानाच अचानक राजीनामा दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यातच बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावर उपराष्ट्रपती पदासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचंही नाव चर्चेत आलं आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव उपराष्ट्रपतीपदासाठी पुढे आणून भाजप मोठा डाव टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वर्षाच्या अखेरीस होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्र-हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीतही एकतर्फी बहुमत मिळवले तर भाजप मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावू शकतो. आजपर्यंतच्या इतिहासात बिहारमध्ये भाजपचा एकदाही मुख्यमंत्री झाला नसल्याने यंदा भाजपनं मोठा प्लॅन आखल्याची चर्चा आहे.
भाजप (BJP) बिहारमध्ये कायमच नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षासोबत आघाडीकरून ते सत्तेत राहिला बसल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे बिहारच्या 2025 च्या विधानसभा निवडणुकीतही नितीश कुमारच एनडीएचा चेहरा असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी नितीश कुमारांच्याच नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं भाजप नेते सांगत असले तरी अधिकृतपणे तसं जाहीर केल्याचं दिसून आलेलं नाही.
महाराष्ट्रात भाजपनं जे एकनाथ शिंदेंसोबत 2024 च्या विधानसभा निवडणुकीत केले तेच बिहारच्या राजकारणात नितीश कुमारांसोबत होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली. मात्र, सत्ता येताच एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कमी जागांचे कारण सांगत भाजपचा मुख्यमंत्री करण्यात आला.
बिहारमध्ये भाजपनं 2020 च्या निवडणुकीत कमी जागा असलेल्या नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देऊ केले होते. पण यावेळी मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्रातील विजयानं आत्मविश्वास दुणावलेला भाजप स्वबळावर बहुमताच्या जवळ जाईल आणि नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षाचा पाठिंब्यावर सरकार स्थापन करायचं. आणि भाजपचं आजपर्यंतचं मुख्यमंत्रीपदाचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याचा भाजपच्या गोटात चर्चा आहे.
भाजपनं या निवडणुकीच्या आधी नितीश कुमारांना भाजप-जेडीयूच्या युतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नितीश कुमारांच्या नावाची घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही.
केंद्रात जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एनडीए सरकार हे बहुमतात असले तरी त्यांच्या सरकारला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचे टेकू आहे. केंद्रामध्ये भाजपला नितीश कुमार यांची आवश्यकता आहे. त्यामुळे बिहारमध्ये ते नितीश कुमारांच्या विरोधात उघडपणे बोलत नाही. तसेच त्यांना उपराष्ट्रपतीपदासाठी नाव सुचवू शकतात. पण मोदी-शाह हे नेतेमंडळी हातचं राखून राजकारण खेळणारे आहेत. त्यामुळे ते इतक्या सहजासहजी आपले पत्ते ओपन करणार नाहीत.
अशातच बिहारच्या निवडणुका तोंडावर असताना अचानक जगदीप धनखड यांचा राजीनामा घेत मोदी-शाह काहीतरी मोठं राजकीय उलथापालथ घडवणार असल्याचे संकेत आहेत. पण उपराष्ट्रपतीपदासाठी पुढे येऊ लागल्यानं चर्चांना उधाण आलं असून त्यांचा एकनाथ शिंदे होणार नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.