One Nation One Election : पहिल्याच परीक्षेत मोदी सरकार फेल, सर्वात मोठे आव्हान तर पुढे; असा आहे नंबरगेम…

Modi Government Parliament Lok Sabha Rajya Sabha Congress BJP : एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत सादर करण्यासाठी झालेल्या मतदानात सरकारला 272 चा आकडाही गाठता आला नाही.
Lok Sabha, Narendra Modi
Lok Sabha, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : बहुमतातील एनडीए सरकार मंगळवारी नव्या संसद भवनातील पहिल्याच परीक्षेत फेल झाले. एक देश एक निवडणूक हे विधेयक लोकसभेत स्वीकारण्यात आले असले तरी त्यासाठी झालेल्या मतदानाने सरकारसमोरील यापुढील सर्वात मोठ्या आव्हानाचे संकेत दिले आहेत. हे विधेयक लोकसभेसह राज्यसभेत मंजूर करताना सरकारची खरी कसोटी लागणार आहे.

लोकसभेत बुधवारी झालेल्या मतदानप्रक्रियेत विधेयकाच्या बाजूने केवळ 269 मते पडली. भाजपने व्हीप जारी करूनही जवळपास 20 सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे लोकसभेत बहुमत असूनही सरकारला 272 चा आकडाही गाठता आला नाही. विशेष म्हणजे नव्या संसद भवनात मंगळवारी पहिल्यांदाच मतदानाची प्रक्रिया पार पडली.

Lok Sabha, Narendra Modi
PM Narendra Modi : शहांच्या बचावासाठी पंतप्रधान मोदी सरसावले; आंबेडकरांवरून सुरू असलेल्या वादात उडी

असो, मंगळवारी झालेले मतदान हा प्रक्रियेचा भाग असला तरी त्यामुळे सरकारसमोरील आव्हान किती बिकट आहे, हे स्पष्ट झाले आहे. एक देश एक निवडणूक विधेयक हे घटनादुरुस्तीचे विधेयक आहे. हे विधेयक पारित करण्यासाठी विशेष बहुमताची आवश्यक आहे. घटनेतील कलम 368 (2) नुसार घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतियांश बहुमताने विधेयकाला मंजुरी मिळावी लागणार आहे.

लोकसभेतील नंबरगेम

विशेष बहुमताशिवाय हे विधेयक पारित होऊ शकत नाही. त्यामुळे मोदी सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे. याचे कारण म्हणजे, मोदी सरकारकडे किंवा एनडीएकडे दोन तृतियांश बहुमत नाही. सध्या एनडीएचे लोकसभेत 293 सदस्य आहेत. मात्र दोन तृतियांश बहुमतासाठी 362 हा जादूई आकडा आहे. हा आकडा गाठण्यासाठी एनडीएकडे 69 सदस्यसंख्या अपुरी आहे.

Lok Sabha, Narendra Modi
Amit Shah : आंबेडकरांविषयी अमित शहांच्या कोणत्या विधानामुळे विरोधकांचा संताप? दिल्लीसह महाराष्ट्रतही पडसाद

लोकसभेत विधेयक पारित करून घेण्यासाठी मोदी सरकारला विरोधी पक्षांची सोबत घ्यावी लागणार आहे. एक तर सर्वसंमतीने हे विधेयक पारित करावे लागेल किंवा इंडिया आघाडीत फूट पाडावी लागणार आहे. पण सध्यातरी इंडिया आघाडी विधेयकाविरोधात एकजूट दिसत आहे. त्यामुळे लोकसभेत मोदींना खूप कसरत करावी लागणार आहे.

राज्यसभेतील नंबरगेम

राज्यसभेत विधेयक पारित करण्यासाठी 164 चा आकडा पार करावा लागणार आहे. सध्या एनडीएचे 245 पैकी केवळ 112 सदस्य आहेत. तर सहा नामनिर्देशित सदस्यांचा पाठिंबाही सरकारला असेल. इथे आणखी 52 सदस्यांचा पाठिंबा सरकारला मिळवावा लागणार आहे. एनडीए किंवा इंडिया आघाडीत नसलेल्या इतर पक्षांची साथ सरकारला मिळाली तरी बहुमतापर्यंत पोहचता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com