Madha Constituency : मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत माढ्यात घडामोडींना 'ब्रेक' लागलाच नाही!

Madha Loksabha Election : मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत या मतदारसंघात घडामोडी सुरूच राहिल्या.
Ranjitshinh Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Ranjitshinh Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil-Sharad PawarSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून माढा हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत या मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडत राहिल्या. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि या घडामोडींना सुरुवात झाली. त्यानंतर राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले ते अखेरपर्यंत कायम राहिले.

2019 ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील इच्छुक होते, मात्र विजयसिंहांनी निवडणूक लढवावी, असा शरद पवार(Sharad Pawar) यांचा आग्रह होता. त्यातूनच शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्यामुळे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे कुटुंबीय भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी लोकसभेची उमेदवारी भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिली. त्यांना निवडून आणण्यात मोहिते कुटुंबीयांचा मोठा वाटा होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ranjitshinh Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Raj Thackeray News : वर्षापूर्वीच कोकण वाचवा म्हणणारे राज यांनी त्याच मुद्द्यावरून उद्धवना विकासविरोधी ठरवले!

कालांतराने त्यांच्यातही खटके उडू लागले. त्यामुळे खासदार निंबाळकर यांनी मतदारसंघातील मोहिते पाटील विरोधकांची जुळवाजुळव सुरू केली. निवडणूक जाहीर व्हायच्या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार निंबाळकर यांचे तोंडभरून कौतुक केले. त्याद्वारे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही, असा संदेश पक्षाने मोहिते पाटील कुटुंबियांना दिला.

दरम्यान, माढा मतदारसंघातून(Madha Constituency) राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली शरद पवार यांनी सुरू केल्या होत्या. जवळपास ते निश्चितही झाले होते, मात्र अखेरच्या क्षणी महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिकडे भाजपसोबत बिनसलेल्या मोहिते पाटलांचा मार्ग मोकळा झाला. धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केला. त्यांना उमेदवारीही जाहीर झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेते उत्तम जानकर हेही पक्षावर नाराज होते. तेही शरद पवार यांच्यासोबत जाणार, असे संकेत मिळू लागताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना खास हेलिकॉप्टर पाठवून बोलावून घेतले. तेथून परत येताच उत्तम जानकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशा पद्धतीने गेल्या अनेक वर्षांचे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचे राजकीय वैर संपुष्टात आले.

Ranjitshinh Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Lok Sabha Election 2024 : शरद पवारांच्या डावपेचांमुळे तिसऱ्या टप्प्यातील अनेक मतदारसंघांत 'थरार'

मोहिते पाटील(Mohite Patil) यांच्या निर्णयामुळे भाजपनेते अस्वस्थ झाले होते, कारण या निर्णयाचा परिणाम माढ्यासह सोलापूर मतदारसंघावरही होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे भाजपने नवा डाव टाकला. शरद पवार यांच्यासोबत असलेले पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना अडचणीत आणण्यात आले. बँकेच्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली.

कारखान्याच्या तीन गोदामांना टाळे लावण्यात आले. त्यानंतर अभिजित पाटील यांनी सोलापूर येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू, असे त्यांचे ठरले. अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर पुण्यातील कर्जवसुली लवादासमोर विठ्ठल कारखान्याची सुनावणी झाली. त्यात अर्थातच पाटील यांना दिलासा मिळाला. तिन्ही गोदामे संचालक मंडळाच्या ताब्यात देण्याचा निर्णय लवादाने दिला.

Ranjitshinh Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar
Abhijeet Patil : फडणवीससाहेब, अभिजित पाटलांमुळे माढा-सोलापुरात वजाबाकी तर होणार नाही ना?

हा उघडपणे झालेले सौदा होता. ईडी, सीबीआयचा जसा धाक दाखवला जातो, तसाच हाही एक प्रकार होता. भाजपसोबत आलात की जप्तीची कारवाई थांबणार, हा तर्क समाजाला पटणार आहे का, लोक काय म्हणतील, याची तमा कुणीही बाळगली नाही. भाजपचा हा डाव यशस्वी झाला असे वाटत असतानाच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला.

भाजपने अभिजित पाटील यांना सोबत घेतल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी अलर्ट मोडवर आले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी फडणवीस यांची विठ्ठल कारखान्यावर सभा झाली. या सभेला भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूर -मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला. अशा पद्धतीने मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत माढा मतदारसंघात घडामोडी घडतच राहिल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com