Pune Porsche Crash Case: 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणी मोठी अपडेट; 'पोर्श’ मोटारीच्या तपासणीतून धागेदोरे लागणार हाती..!

Hit And Run Case Update : पुणे आरटीओ अधिकाऱ्यांसह ‘पोर्श’ कंपनीच्या पथकाने मोटारीची सोमवारी (ता.27) तपासणी केली.यावेळी त्यांनी मोटारीच्या इलेक्ट्रॉनिक डेटासह पुढील आणि मागील बाजूच्या कॅमेऱ्यातील चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.
Pune Porsche Car
Pune Porsche CarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या ‘पोर्श’ या आलिशान कारच्या मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन चालकाने दोन जणांना चिरडले होते. या प्रकरणावरुन एकीकडे राजकारण तापले असतानाच दिवसागणिक त्यात धक्कादायक खुलासे समोर येत आहे. आता तांत्रिक तपासणीतून अपघात कसा झाला, याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

पुणे आरटीओ अधिकाऱ्यांसह ‘पोर्श’ कंपनीच्या पथकाने मोटारीची सोमवारी (ता.27) तपासणी केली.यावेळी त्यांनी मोटारीच्या इलेक्ट्रॉनिक डेटासह पुढील आणि मागील बाजूच्या कॅमेऱ्यातील चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.

Pune Porsche Car
Pune Porsche Accident : मोठी बातमी, अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले ; त्रिसदस्यीय समितीमार्फत होणार चौकशी !

गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांनी पोर्शे कारच्या तपासणीनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ही पोर्श मोटार(Porsche Crash Case) ऑनलाइन सिस्टीम ऑपरेटेड’ आहे. तिचा डेटा रिकव्हर करण्याचे काम करण्यात येत आहे. मोटारीचा ब्रेक किती वेळा दाबला? अपघातावेळी मोटारीचा वेग किती होता? किती वेळा ॲक्सिलेटर देण्यात आला? या बाबी स्पष्ट होतील. कंपनीकडून हा महत्त्वपूर्ण डेटा पोलिसांना प्राप्त होइल. मोटारीतील कॅमेऱ्याच्या चित्रीकरणातून अपघात कसा झाला, हेही आता तपासणीतून स्पष्ट होणार आहे

कारचालकाला पोलिस संरक्षण

अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी मोटारचालकाचे अपहरण करून तो मोटार चालवत असल्याचा दबाव आणला होता. या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेले वाहन जप्त केले असून, चालकाचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. या तपासातील प्रमुख साक्षीदार आणि मोटार चालकास पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरोपींच्या कठोर शिक्षेसाठी प्रयत्न

या प्रकरणात कलम 304 नुसार दाखल गुन्ह्यात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. आरोपींच्या मोबाईल क्रमांकाचे ‘सीडीआर’ तपासण्यात येत आहेत.

घटनास्थळ आणि आरोपींच्या बंगल्यातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध तांत्रिक पुरावे गोळा करून न्यायालयात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त बलकवडे यांनी सांगितले.

Pune Porsche Car
NCP Ajit Pawar News : लोकसभेचा निकाल बाकी, तोच विधानसभेच्या जागावाटपावरुन अजितदादांचं दबावतंत्र?

अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलले असल्याचा धक्कादायक बाब पुणे पोलिसांनी समोर आणली आहे. यामध्ये डॉ. अजय तावरे यांचा सहभाग असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या डॉ. तावरेंची अधीक्षकपदी नियुक्ती करावी, अशी शिफारस वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे(Sunil Tingre) यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली असल्याचे समोर आले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Pune Porsche Car
Prajwal Revanna News : 'मी 31 मे रोजी SIT समोर येणार' ; महिनाभरानंतर पहिल्यांदाच प्रज्ज्वल रेवण्णाचं विधान समोर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com