काँग्रेसला धक्का देत मिरजमध्ये शिवसेनेची फिल्डिंग : सुरेश खाडेंविरोधात उभा केला त्यांचाच कार्यकर्ता

Sangli Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात राजकारण तापत असून फोडाफोडीच्या राजकारणाला बहर आला आहे. नुकताच काँग्रेसने अन्याय केला म्हणत वसंतदादा घराण्याच्या नात सून तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताईंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Sangli Politics Eknath Shinde Mohan Vankhade And BJP MLA Suresh Khade
Sangli Politics Eknath Shinde Mohan Vankhade And BJP MLA Suresh Khade sarkarnama
Published on
Updated on

बातमीचा सारांश :

  1. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

  2. जयश्री पाटील (वसंतदादा पाटील यांची नातसून) भाजपमध्ये, तर मोहन वनखंडे शिवसेनेत दाखल झाले आहेत.

  3. या घडामोडींमुळे काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Sangli News : नुकतीच सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची प्रारूप रचना जाहीर झाली आहे. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. पण याच धामधुमीत काँग्रेसला लागले गळतीचे ग्रहण कायम आहे. नुकताच काँग्रेसने अन्याय केला म्हणत वसंतदादा पाटील यांची नातसून तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे यांनीही काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत मतभेद झाल्याने वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांची थेट प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण स्थानिक नेते आपल्याला मान देत नसल्याची त्यांची तक्रार होती. यामुळे ते नाराज होते. काही दिवसांपूर्वी वनखंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. पण ते नेमकं कोणत्या पक्षात जाणार याचा निर्णय झाला नव्हता.

Sangli Politics Eknath Shinde Mohan Vankhade And BJP MLA Suresh Khade
Sangli Politics : जयश्री पाटलांच्या धक्क्यानंतर काँग्रेस नेत्यांना जाग आलीच; विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी स्थानिकसाठी ठोकला शड्डू

अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत एका कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी अन्य पक्षात वनखंडे यांची घुसमट झाली असा प्रकार शिवसेनेत होणार नाही. पक्ष संघटना पातळीवर चांगली संधी दिली जाईल, असा शब्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. या प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेत चर्चा केली. त्यांच्या प्रवेशासाठी आमदार सुहास बाबर, चंद्रहार पाटील यांनी जोर लावल्याचं बोललं जात आहे.

मिरजमध्ये शिवसेनेची फिल्डिंग :

वनखंडे यांच्याबरोबर अनिता वनखंडे, सागर वनखंडे, शंकर शिंदे, संजय विभुते यांच्यासह मिरज शहर आणि पूर्वभागातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापूर्वी जयश्री पाटील यांच्या भाजपप्रवेशाने सांगली महानगरपालिकेतील राजकीय गणितचं बदलली आहेत. आता वनखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मिरज मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत. भाजपमध्ये असताना वनखंडे यांची आमदार सुरेश खाडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख निर्माण झाली होती. मिरज मतदारसंघात ते मोठ्या प्रमाणात सक्रिय होते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

प्र.1: सांगली जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी कधीपासून सुरू झाली आहे? उ.1: नुकतीच सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे.

प्र.2: काँग्रेसला नुकतेच कोणत्या दोन मोठ्या नेत्यांनी रामराम ठोकला आहे? उ.2: वसंतदादा पाटील यांची नातसून तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

Sangli Politics Eknath Shinde Mohan Vankhade And BJP MLA Suresh Khade
Sangli Political Battle: सांगलीचा 'वस्ताद' कोण? निशिकांत पाटलांची 'जयंत पाटलांना' टफ फाईट, जिल्हा टप्प्यात आणलाय...

प्र.3: जयश्री पाटील यांनी काँग्रेस सोडून कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे? उ.3: जयश्री पाटील यांनी काँग्रेसला अन्याय केल्याचा आरोप करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

प्र.4: मोहन वनखंडे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश केला? उ.4: मोहन वनखंडे यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला आहे.

प्र.5: या पक्षबदलांचा सांगलीतील काँग्रेसवर काय परिणाम होण्याची शक्यता आहे? उ.5: जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर दोन मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडल्याने सांगलीतील काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, त्यांच्यासाठी ही गळती चिंतेची बाब आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com