Shivraj Patil : अख्खं आयुष्य काँग्रेसला वाहिलेल्या शिवराज पाटलांनी पीएम मोदींकडे व्यक्त केली होती 'ती' इच्छा; पण आता अपूर्णच राहणार!

PM Modi Delhi Meeting News : राजकीय क्षेत्रात काम करीत असताना चाकूरकरांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनंतर पीएम नरेंद्र मोदींशी जवळीकता कायम ठेवली होती.
Shivaraj Patil, Narendra mod
Shivaraj Patil, Narendra modi Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची ओळख सात वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळणारे नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, गृहमंत्री, पंजाबचे माजी राज्यपाल अशी राहिली. काँग्रेसचे एकनिष्ठ, गांधी परिवारचे जवळचे नेते, सोनिया गांधीचे विश्वासू म्हणून त्यांना ओळखले जात होते. शुक्रवारी पहाटे त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठवाड्याची मोठी हानी झाली आहे.

राजकीय क्षेत्रात काम करीत असताना चाकूरकरांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनंतर पीएम नरेंद्र मोदींशी जवळीकता कायम ठेवली होती. दोघेजणही वेगवेगळ्या पक्षात जरी असले तरी त्यांच्यातील संबंध चांगले होते. सहा महिन्यापूर्वी त्यांनी या भेटीतून जुन्या स्मृतींना उजाळा दिला होता. त्यावेळी मोदींची भेट घेऊन निमंत्रणही दिले होते. मात्र, शिवराज पाटलांच्या अकाली एक्झिटने त्यांची 'ती' इच्छा अपूर्णच राहिली आहे.

शिवराज पाटील-चाकूरकर यांनी राजकारणात स्वतःची वेगळी प्रतिमा नेहमीच जपली होती. वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांसोबत त्यांनी राजकारणापलीकडील नाते कायम जपले होते. देशात 1996 नंतर भाजपच्या (BJP) पुढाकाराने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले. त्या काळापासून चाकूरकर यांनी तात्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत देखील चांगले संबंध जपले होते. या संबंधाचा त्यांना त्याकाळी फायदाच झाला होता.

Shivaraj Patil, Narendra mod
Shivraj Patil Passes Away : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

1999 सालच्या लोकसभा निवडणुकीत लातूर येथे शाहू कॉलेजच्या मैदानावर अटलबिहारी वाजपेयी यांची भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या सभेत वाजपेयी यांनी चाकूरकर यांच्या विरोधात एकही शब्द काढला नाही. त्यांचा उल्लेख 'चांगला माणूस' असा वाजपेयी यांनी केला मात्र त्यांचा पक्ष चुकीचा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या निवडणुकीत वाजपेयी यांनी केलेल्या भाषणाचा चाकूरकरांना फायदा झाला व ते पुन्हा लोकसभेवर निवडून आले.

2004 ते 2014 या काळात केंद्रात पीएम मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार असताना 2010 ते 2015 दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते. 2014 साली केंद्रातील काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर त्यावेळी भाजप सरकारने काँग्रेसच्या काळात नेमलेल्या राज्यपालांकडील पदभार काढून घेतला होता. मात्र, पंजाबचे राज्यपाल असलेल्या चाकूरकर यांच्याकडील पदभार पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काढून घेतला नव्हता. चाकूरकर यांनीच कारकीर्द पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.

Shivaraj Patil, Narendra mod
Shivraj Patil: राजकीय टीका अन् पाठीमागे विरोध करणे चाकूरकरांना जमलेच नाही..

मार्च 2025 मध्ये काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुटुंबीयांसह भेट घेतली होती. ही भेट कौटुंबिक स्वरूपाची अशीच होती. दिल्लीत एक साहित्य संमेलन पार पडले. या कार्यक्रमास शिवराज पाटील-चाकूरकर हे रसिकांमध्ये बसले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपिठावर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी चाकूरकर यांच्याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांच्या सुनबाई अर्चना पाटील-चाकूरकर यांच्याकडेही चौकशी केली. या संमेलनात गर्दी असल्याने त्यांची भेट झाली नाही.

Shivaraj Patil, Narendra mod
Shivraj Patil Defeat Story : ... तर शिवराज पाटील पहिले मराठी पंतप्रधान असते; 'त्या'पराभवाची इनसाईड स्टोरी

त्यानंतर चाकूरकर यांनी पीएम मोदी यांची वेळ घेऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बराच वेळ दिला. यावेळी त्यांनी विविध विकास कामांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांची शिवराज पाटील-चाकूरकर यांनी यावेळी सहकुटुंब भेट घेतली. त्यावेळी दोघांमध्ये राजकीय चर्चा रंगल्या. या भेटीवेळी शिवराज पाटील-चाकूरकर यांनी लोकसभेचे सभापती असताना केलेल्या नव्या संसद भवनाच्या निर्मितीच्या प्रस्तावाचा पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला.

Shivaraj Patil, Narendra mod
Shivraj Patil Chakurkar: राजकारणात शालीनता कशी जपायची, हे शिवराज पाटील चाकूरकरांनी दाखवून दिलं

यावेळी दोघांमध्ये विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा देखील झाली. त्याचवेळी चाकूरकर कुटुंबियांच्या वतीने पीएम मोदी यांना यावेळी लातूरमधील 'देवघर' या त्यांच्या निवासस्थानी भेटीचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांना त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येता आले नव्हते. त्यामुळे शिवराज पाटलांची ही इच्छा अपूर्णच राहिली.

Shivaraj Patil, Narendra mod
Pune BJP: पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपतर्फे तब्बल 2 हजार 350 इच्छुकांची तयारी; उद्यापासून धडधड वाढणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com