Thackeray brothers reunion: शिवतीर्थावर 'ठाकरी' तोफ धडाडणार! ठाकरे बंधू सीमोल्लंघन करीत 20 वर्षांनंतर एकत्र विचारांचे सोने लुटणार का?

Shivtirtha political rally News : शिवतीर्थावर गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून राज-उद्धव ठाकरे राजकीयदृष्टया एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Uddhav And Raj Thackeray reunion
Uddhav And Raj Thackeray reunionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळेच राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करीत असल्याने घडामोडी वेगाने घडत आहे. गुरुवारी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून राज-उद्धव ठाकरे राजकीयदृष्टया एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

दोन्ही भावाचे दोन महिन्यापूर्वीच मनोमिलन झाले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसेची युती होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून राज-उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येत विचारांचे सोने लुटणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून राज-उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बंधू एकत्र आले आहेत. त्यांनी वरळी येथील डोममध्ये मेळावा घेत सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर दोन्ही बंधू तीन ते चार वेळा एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू राजकीय युतीची बोलणी सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसेची युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्याने केलेल्या सूचक विधानाने आता युतीच्या चर्चांना वेग आला आहे.

Uddhav And Raj Thackeray reunion
Satej Patil : हक्कभंगाचा इशारा देणाऱ्या आमदारांना सतेज पाटलांनी विचारला जाब

ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर गेल्या काही दिवसापासून जंगी तयारी सुरु झाली आहे. एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसत होते. मात्र 2006 साली राज ठाकरेंनी वेगळा मार्ग निवडला. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) कधीच दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर दिसले नाहीत.

त्यातच आता गेल्या काही दिवसापासून यंदाच्या ठाकरेसेनेच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे व्यासपीठावर दिसले तर बाळासाहेब ठाकरेंचे ते स्वप्न पूर्ण होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे गुरुवारी होत असलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर आल्यास ही दोन्ही भावांच्या राजकीय युतीची नवी नांदी ठरणार आहे.

Uddhav And Raj Thackeray reunion
Anil Deshmukh Attack Case : सलीम-जावेदच्या स्टोरीत ट्विस्ट; अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याचे गुढ वाढले, फॉरेन्सिक रिपोर्ट देणार कलाटणी?

ठाकरे गटाचा दसरा मेळावा गुरुवरी होत असून यावेळी सीमोल्लंघनाच्या या मेळाव्यात ठाकरे बंधू 20 वर्षांपूर्वी घातलेल्या सीमा ओलांडून एकत्र येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान-प्रदान होऊ शकते असे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात या मेळाव्याच्या निमित्ताने ते वैचारिक सोने लुटण्याची शक्यता आहे. येतेय काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संधी चालून आली असल्याने दोघेजण युतीची देखील घोषणा करतील, असे दिसते.

Uddhav And Raj Thackeray reunion
RSS 100 Years Journey: RSS ने 50 वर्षे तिरंगा का फडकवला नाही? काय होती कारणे, तिरंगा: नकार ते स्वीकाराचा प्रवास

मुंबईतील शिवाजी पार्कच्या या ऐतिहासिक मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यात दोन्ही ठाकरे सीमोल्लंघन करून एकत्र येणार आणि तब्बल 20 वर्षांनंतर विचारांचे 'सोने' लुटणार का, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या मेळाव्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीची शक्यता हा राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप घडवणारी ठरू शकते. मराठी मतांचे ध्रुवीकरण आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही बंधूंनी एकत्र यावे, अशी शिवसैनिकांची आणि मनसैनिकांची तीव्र इच्छा आहे.

Uddhav And Raj Thackeray reunion
Satej Patil : शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर सरकारचा दरोडा, पडळकरांना पक्षातून काढा, सतेज पाटलांनी सगळचं काढलं

ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही, असे वक्तव्य सत्ताधाऱी पक्षाच्या मंत्र्यांनी केले आहे. महायुती स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहे. महायुती एकत्र असल्याने त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा काहीच परिणाम होणार नसल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.

Uddhav And Raj Thackeray reunion
Eknath Shinde VS BJP : एकनाथ शिंदेंच्या विरोधात भाजपमध्ये नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांकडे करणार तक्रार! नवी मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com