Kolhapur Politics : राजू शेट्टींना इस्लामपूरमधून विरोध ? पवारांच्या भूमिकेकडे लक्ष, विरोधाचे कारण काय ?

Raju Shetti and Sharad Pawar: राष्ट्रवादीतून विरोध आल्याने स्वाभिमानी विरुद्ध राष्ट्रवादी असा छुपा संघर्ष सुरू झाला आहे.
Raju Shetti and Sharad Pawar
Raju Shetti and Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघांच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 'इंडिया आघाडी'मधून प्रागतिक विकास मंचला ही जागा 'स्वाभिमानी'च्या वाटेला सोडली जाणार असल्याची चर्चा होती.

मात्र, राष्ट्रवादीतून विरोध आल्याने स्वाभिमानी विरुद्ध राष्ट्रवादी असा छुपा संघर्ष सुरू झाला आहे. शेट्टीच्या उमेदवारीला इस्लामपूरमधून विरोध होत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. मात्र, आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 2009 ला सुरुंग लावला. 2004 ला विधानसभा सदस्य असलेल्या राजू शेट्टी यांनी 2009 ला लोकसभेत विजय मिळवला. त्यानंतर 2014 ला भाजप आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादीच्या विरोधात विजय खेचून आणला.

मात्र, युतीबरोबर फारकत घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर 2019 च्या निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यात पराभूत झाले. शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी शेट्टींचा पराभव केला. सध्यातरी राजू शेट्टी यांची भूमिका 'एकला चलो'ची आहे.

Raju Shetti and Sharad Pawar
Sanjay Gaikwad: 'ड्रगमाफिया ललित पाटीलच्यामागे उद्धव ठाकरे'; आमदार संजय गायकवाडांचा खळबळजनक आरोप

शेकापचे आमदार जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 13 संघटना एकत्र करून प्रागतिक विकास मंचची स्थापना करून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पण मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थिती लावून प्रागतिक विकास मंच इंडिया आघाडीसोबत असल्याचे जाहीर केले. मात्र, राजू शेट्टी यांनी विरोधी भूमिका घेत आपण स्वतंत्र असल्याचं सांगितलं.

पडद्यामागून लोकसभा निवडणुकीपर्यंत इंडिया आघाडीमधून हातकणंगलेची जागा शेतकरी संघटनेला जाईल, अशी चर्चा होती. पण आता राष्ट्रवादीनेच शेट्टी यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने शेट्टींच्या संघर्षात भर पडली आहे. या मतदारसंघातील उमेदवारीबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना सर्वाधिकार आहेत. त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे.

Raju Shetti and Sharad Pawar
Supriya Sule News : फडणवीस गृहमंत्री असताना ललित कसा पळून गेला; सुप्रिया सुळे यांचा सवाल

शेट्टींच्या विरोधाचे कारण काय ?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांना विरोध केल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा राजकीय वारस तयार करण्यासाठी इस्लामपुरातून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते.

भाजपच्या जवळीकतीने नाराजी

2014 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे शिवसेना आणि भाजपच्या मदतीने लोकसभेच्या रिंगणात होते. युतीच्या पाठिंब्यावरच ते निवडून आले होते. मात्र, निवडून आल्यानंतर दोन ते तीन वर्षांत त्यांनी युतीसोबत फारकत घेऊन आघाडीच्या पाठिंबावर 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात शेट्टी यांचा पराभव झाला होता.

महाविकास आघाडीला फायदा काय ?

2019 च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीशी जवळीक करून शेट्टी यांनी राज्यपालांच्या कोट्यातून 12 आमदारांच्या यादीत आपले नाव कोरले. मात्र, झालेल्या राजकीय घोळामुळे शेट्टी यांनी थेट महाविकास आघाडीलाच टार्गेट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेतल्यानंतरही त्याचा फायदा महाविकास आघाडीला किती झाला ? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. उलट महाविकास आघाडीचा फायदा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेट्टी यांनी मोठी केल्याचा आरोप करतात.

कारखानदाराच्या विरोधात भूमिका ?

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत बहुतांश कारखानदार हे महाविकास आघाडीत असणाऱ्या नेत्यांकडे आहेत. इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी हमीभावची अट शेट्टी यांनी घातली, तर आत्तादेखील मागील हंगामातील उर्वरित 400 रुपये देण्यावरून शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा सुरू केली आहे. शेट्टी यांनी नेहमी शेतकऱ्यांची बाजू घेऊन कारखानाविरोधात आपली मोहीम सुरू ठेवली आहे. त्यामुळे पदावर आल्यास कारखानदारांना आणखीन कोंडीत पकडतील, अशी भूमिकादेखील कारखानदारांची आहे.

शेट्टींची सोयीस्कर भूमिका अडचणीची

स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच सोयीस्कर भूमिका घेतलेली दिसून येते. बऱ्याच वेळी त्यांनी राजकीय स्वार्थदेखील साधून घेतलेला आहे. तर कधी फटकादेखील बसला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या पाठिंबा घेतला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचा पाठिंबा घेतल्यानंतर त्यांना पराभव पत्करावा लागला. शेट्टी यांच्या बदलत्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यांच्या सोयीस्कर भूमिकेची अडचण आघाडीतील कार्यकर्त्यांना आहे.

Edited by Ganesh Thombare

Raju Shetti and Sharad Pawar
MLA Disqualification Hearing : आमदार अपात्रता प्रकरणात शुक्रवारी राहुल नार्वेकर मोठा निर्णय देणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com