Assembly Election
Assembly ElectionSarkarnama

Solapur Politic's : लोकसभेत महायुतीला ‘कात्रजचा घाट’ दाखविणाऱ्या सोलापूरचा विधानसभेत कौल कोणाला?

Assembly Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज विधानसभेची निवडणूक जाहीर केली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला जनादेश मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
Published on

Solapur, 15 October : मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पारड्यात भरभरून दान टाकणाऱ्या सोलापूर जिल्ह्याने लोकसभा निवडणुकीत भाजपला ‘कात्रज घाट’ दाखवत दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्या, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूरकरांच्या मनात काय दडलंय, याची उत्सुकता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज विधानसभेची निवडणूक जाहीर केली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला जनादेश मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याने (Solapur) अकरा जागांपैकी तब्बल सहा जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या होत्या. एका जागेवर शिवसेना जिंकली होती, तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसने एक जागा जिंकली होती.

गेल्या पाच वर्षांत राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुमारे अडीच वर्षे या तीन पक्षाने सत्ता राखली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले. वर्षभरानंतर अजित पवारही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून शिवसेना-भाजपसोबत गेले.

राज्यस्तरावरील राजकीय घडामोडींचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही पाहायला मिळाले. तीन पक्ष सत्तेत गेल्यामुळे विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजप शिवसेनेचे संख्याबळ सातवर असताना राष्ट्रवादी सोबत आल्यामुळे शेवटच्या काही वर्षांत ते दहावर पोचले. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या एकमेव विरोधी पक्षात आमदार राहिल्या होत्या.

Assembly Election
Madha : सुनेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे माजी आमदार उतरले मैदानात; सहकुटुंब भेटले शरद पवारांना

राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातील फुटीची सहानुभूती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बूस्टर डोस ठरली. लोकसभा निवडणुकीत सत्तेवर असणाऱ्या भाजपला सोलापूरच्या जनतेने चांगलाचा हिसका दाखवत दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या पारड्यात भरभरून दान टाकणाऱ्या सोलापूर जिल्ह्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला कात्रजचा घाट दाखवला.

लोकसभा निवडणुकीतील वारे लक्षात घेऊन महायुतीकडील अनेकांनी महाविकास आघाडीचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मिळालेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली, त्यामुळे तुतारीकडून अनेकांना विधानसभा गाठायची आहे.

सत्तेवर असलेल्या महायुतीच्या काही विद्यमान आमदारांनी महाविकास आघाडीकडून विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी चाचपणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेला कौल लक्षात घेऊन अनेकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी पवारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत, त्यामुळे निकालाआधीच महायुतीकडे पाठ फिरवणाऱ्यांची संख्या मोठी दिसून येत आहे.

Assembly Election
Vidhansabha Election 2024 : फडणवीस म्हणतात ‘महाराष्ट्र तुमच्या आशीर्वादाची अन्‌ भक्कम जनादेशाची वाट बघतोय...’

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीतील मतदारसंघनिहाय पक्षीय बलाबल

  • सोलापूर शहर उत्तर......... भाजप

  • दक्षिण सोलापूर............. भाजप

  • सोलापूर शहर मध्य........ काँग्रेस

  • अक्कलकोट............... भाजप

  • मोहोळ.................. राष्ट्रवादी काँग्रेस

  • करमाळा ............राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष

  • माळशिरस............. भाजप

  • बार्शी............... भाजप पुरस्कृत अपक्ष

  • माढा................ राष्ट्रवादी

  • सांगोला............. शिवसेना

  • पंढरपूर मंगळवेढा....भाजप (पोटनिवडणुकीत विजय)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com