Kolhapur Politics : आता सुट्टी नाही; खासदार पुत्राने घेतली राजकारणात एन्ट्री!

Loksabha Election : धनंजय महाडिक यांचा चिरंजीव कृष्णराज यांना राजकारणाचे वेध. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी मैदानात.
Kolhapur
Kolhapur Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : इंडियाचा रेसिंग स्टार, युथ आयकाँन म्हणून ओळख असलेला आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा चिरंजीव कृष्णराज यांना देखील आता राजकारणाचे वेध लागलेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या कोल्हापुरातील शाहू स्टेडीयम येथे सुरु असलेल्या केएम चषक आणि राज्य सरकारकडून आणलेल्या कोल्हापूर (Kolhapur) शहराच्या रस्त्यांसाठी 25 कोटींचा स्वतंत्र निधी आणल्याचे बॅनर झळकलेत. पण त्याचं पोस्टरवर "आता सुट्टी नाही" अशा आशयचा मजकूर सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे कृष्णराज यांनी राजकारणात सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत दिले.

Kolhapur
Eknath Shinde : "सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत ठिक होतं, लिमिटच्या बाहेर गेलं की...", मुख्यमंत्री अन् पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल

ब्रिटिश फॉर्म्यूला 3 चॅम्पियनशिप या रेसिंग स्पर्धेवर भारताचे नाव कोरल्यानंतर कृष्णराज महाडिक यांचे नाव जगभर झाले. कोरोना काळात स्वदेशी परतल्यानंतर त्यांनी 'युट्युब'च्या माध्यमातून संपर्क सुरु ठेवला. फॅमिली ब्लॉग, सामाजिक विषय हाताळत महाराष्ट्रात परिचित झाले. त्यामुळे राज्यभर त्यांचा एक मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. युट्यूब आणि फेसबुकमधून मिळणारे पैसे त्यांनी समाजातील गरजू लोकांसाठी खर्च केला जात आहे. त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत वडील धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यासोबत दीड महिने राहून खेळाडूपणाची आवड ठेवत कृष्णराज यांना राजकारणाचीही गोडी लागली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कामाने प्रभावित होऊन राजकारणात रस निर्माण करण्याचा पहिलाच प्रयत्न कृष्णराज यांनी केला आहे. सध्या कोल्हापूर शहरात केएम चषक इस फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. तर कोल्हापुरातील रस्त्यांसाठी नुकताच राज्य सरकारकडून 25 कोटींचा निधी कृष्णराज यांनी नुकताच खेचून आणला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संपूर्ण शहरभर त्यांचे फलक लागले. या फलकावर कोल्हापुरच्या विकासासाठी "आता सुट्टी नाही", अशा शब्दात मजकूर लिहून त्यांनी राजकारणात येण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कृष्णदाच्या रूपाने महाडिक घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी जिल्ह्यात स्वतंत्र महाडिक गट तयार केला. वडील धनंजय महाडिक यांनी महाडिक गटाबरोबरच युवाशक्तीने आपला स्वतंत्र गट तयार केला. पण जिल्ह्यातील महाडिक आणि युवाशक्तीला आणखी मजबूत करण्यासाठी कृष्णराज यांच्या रूपाने विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत.

(Edited by Amol Sutar)

Kolhapur
NCP Sharad Pawar: '...म्हणून मी संजय राऊतांचा फॅन!'; असं शरद पवार गटाचा माजी आमदार का म्हणाला?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com