Thane Election : आपल्याला शिवसेनेची काय गरज? ठाणे भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; युतीची कुणकुण लागताच कार्यकर्ते आक्रमक

Thane Municipal Corporation Election 2025 : राज्यात महायुती म्हणून निवडणुका लढवण्याची अधिकृत घोषणा झाली असली, तरी ठाणे भाजपमध्ये मात्र या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी उफाळून आली आहे.
Shankar Patole caught accepting ₹25 lakh bribe in unauthorized shops case, arrested by Anti-Corruption Bureau.
Shankar Patole caught accepting ₹25 lakh bribe in unauthorized shops case, arrested by Anti-Corruption Bureau.Sarkarnama
Published on
Updated on

Thane Municipal Corporation Election : राज्यात महायुती म्हणून निवडणुका लढवण्याची अधिकृत घोषणा झाली असली, तरी ठाणे भाजपमध्ये मात्र या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी उफाळून आली आहे. ‘‘आम्हाला युती नको, स्वबळावरच लढा,’’ अशी आक्रमक भूमिका घेत ठाण्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार व जिल्हाध्यक्षांकडे धाव घेतली. या नाराजीनाट्यामुळे ठाण्यातील महायुतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Shankar Patole caught accepting ₹25 lakh bribe in unauthorized shops case, arrested by Anti-Corruption Bureau.
Manikrao Kokate: कोकाटेंचं क्रीडा खातं आता 'हा' बडा नेता सांभाळणार; महत्वाची अपडेट आली समोर

गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सातत्याने संघर्ष सुरू होता. दोन्ही पक्षांनी ‘स्वबळाचा’ नारा देत कार्यकर्त्यांना कामाला लावले होते. त्यानुसार अनेकांनी प्रभागांमध्ये मोर्चेबांधणी करून मोठी आर्थिक गुंतवणूकही केली होती, मात्र अचानक युती जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यातून हा रोष बाहेर पडला आहे.

Shankar Patole caught accepting ₹25 lakh bribe in unauthorized shops case, arrested by Anti-Corruption Bureau.
Balraje Pawar: भाजपच्या माजी आमदाराचा भाऊ 48 तासात बाहेर; बाळराजे पवारांना जामीन

ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांची भेट घेऊन लेखी निवेदने दिली. ठाण्यात भाजपची ताकद वाढलेली असताना युतीची गरज काय, असा सवाल त्यांनी केला आहे, तर काही पदाधिकाऱ्यांनी तर युती झाल्यास निवडणूक काम न करण्याचा इशाराही दिला आहे.

Shankar Patole caught accepting ₹25 lakh bribe in unauthorized shops case, arrested by Anti-Corruption Bureau.
काँग्रेस खासदाराच्या मोबाईलमध्ये दडलंय काय? प्रियांका चतुर्वेदींसह केंद्रीय मंत्र्यांची नजर हटेना

प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढवून संधी मिळावी, अशी इच्छा असते. ‘युती नको’ ही कार्यकर्त्यांची भावना असली, तरी शेवटी वरिष्ठांचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य आहे. आम्ही नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी दिली.

Shankar Patole caught accepting ₹25 lakh bribe in unauthorized shops case, arrested by Anti-Corruption Bureau.
Kalyan Dombivali Election: "भाजपनं दार बंद करून जबरदस्ती पक्षप्रवेश करून घेतला"; माजी नगरसेवकाचा खळबळजनक आरोप

राजकीय पेचप्रसंग

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असला तरी भाजपनेही गेल्या काही काळात आपली बांधणी मजबूत केली आहे. अशातच जागावाटपात भाजपला कमी जागा मिळाल्यास हा असंतोष अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता या नाराजीवर भाजपचे वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com