Thackeray vs Shinde Group : सरकारचा संदेश, विरोधात लिहाल तर तुरुगांत जाल; अनिल परबांनी सगळंच सांगितलं

Aditya Thackeray : ठाण्यात नऊ महिन्यांपासून अत्याचार वाढल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप
Anil Parab
Anil ParabSarkarnama
Published on
Updated on

Anil Parab in Thane : ठाकरे गटाच्या समर्थक असलेल्या रोशनी शिंदे यांना सोशल मीडियावर मुख्यमंत्री, पंतप्रधानांवर पोस्ट केल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी रोशनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवमान केल्याचा आरोप करण्यात आला.

सध्या रोशनी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांची पोलिसांनी तक्रार घेतली नाही, असा आरोप करून आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जनप्रक्षोभ मोर्चाचे आयोजन केले होते. यात महाविकास आघाडीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Anil Parab
Aditya Thackeray : हिंदुत्वाचं नाही हे रावणाचं राज्य, यांना अयोध्याला जाण्याचा अधिकार नाही : आदित्य ठाकरेंनी शिंदेंनी डिवचलं!

यावेळी माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच पोलिसांच्या कारभारावरही टीका केली. परब म्हणाले, "रोशनी शिंदे यांना मारहाण केली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. त्यासाठी जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी फक्त शिंदे यांच्या नावाने 'एनसी' दाखल करून घेतली आहे. 'एनसी' दाखल करून आम्ही कायद्याची प्रक्रिया राबवित असल्याचा दिखावा पोलीस करीत आहेत. तर ज्यांनी मारहाण केली त्यांनी रोशनी शिंदे यांच्याविरोधात दिलेली तक्रार दाखल करून घेतली आहे."

Anil Parab
Satara News : सावरकर गौरव यात्रेत छत्रपतींच्या वारसांनी सहभागी होणे दुर्देवी...

ज्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली त्या पोस्टमध्ये गुन्हा दाखल करण्यासारखे काहीच नसल्याचे यावेळी परब यांनी सांगितले. ते म्हणाले, "रोशनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ती कुठल्याही सायबर गुन्ह्याच्या अंतर्गत येत नाही. तरीही त्यांच्याविरोधात १५३ (३) कलम लावण्यात आले. त्यानुसार त्यांना अटक करून सात आठ दिवस तुरुंगात ठेवण्यात येईल. त्यातून सर्वांना संदेश द्यायचा की आमच्या विरोधात कुणी काही लिहिले तर त्यांना तुरुगांत पाठवू. पोलिसांनी एकाला कायदा लावायचा एकाला नाही असे करू नये. आम्ही हे प्रकरण तडीस नेल्याशिवाय राहणार नाही."

Anil Parab
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल केली अन् 'वन्समोअर'ची मागणी झाली!

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, "ठाण्यात गेल्या नऊ महिन्यांपासून अनेक अत्याचार वाढले आहेत. गद्दार गँगकडून जमीनी बळकावणे, धमकावणे असे प्रकार होत आहे. त्यातच महिलेवरील हल्ला हा प्रकार अत्यंत गलिच्छ होता. एका पोस्टवरून त्यांच्या हल्ला केला. यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रारही घेतली नाही. मात्र जिच्यावर हल्ला झाला त्या रोशनी शिंदे यांच्याविरोधात दिलेली तक्रार घेण्यात आली आहे. रुग्णालयाबाहेर पोलीस फिरत आहेत. रोशनी बऱ्या होतील, त्यांना डिस्चार्ज मिळाला की त्यांना अटक करण्यात येईल. त्यांना तुरुंगात टाकण्यात येईल. हा एक घाणरेडा प्रकार काही दिवसांपासून राज्यात रुजला आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com