Nitish Kumar Sarkarnama
देश

INDIA Aghadi : नितीशकुमार 'इंडिया' आघाडीचे संयोजक ! काँग्रेसची सहमती, लालूंची नाराजी?

Organizer of Nitish Kumar India Aghadi : महाआघाडीतील 5 नेत्यांनी नितीश कुमार यांच्या नावावर सहमती दर्शवली.

Amol Sutar

INDIA Aghadi : देशात आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी देशातील इतर पक्ष एकवटले आहेत. त्यातून 'इंडिया' आघाडी तयार झाली आहे. मात्र, यावर अद्याप निर्णायक चर्चा झालेली नाही. याअगोदर दोन बैठका पार पडल्या असताना आता आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत नितीशकुमार आघाडीचे संयोजक बनू शकतील. आघाडीतील नेत्यांमधून असा सूर निघाला आहे.

याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 11 सदस्यांच्या समन्वय समितीबाबत या बैठकीत निर्णय होणार आहे. तर महाआघाडीत सहभागी 5 नेत्यांनी संयोजकपदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे. तर नितीशकुमार यांच्याशी काँग्रेसकडूनही संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नितीश कुमार यांना संयोजक बनवण्यास सहमती दर्शवली आहे. 'जेडीयू'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाआघाडीत सहभागी 5 नेत्यांनी संयोजकपदासाठी नितीश कुमार यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे, मात्र 'आरजेडी';चे सर्वेसर्वा लालू यादव यांच्या विरोधामुळे या बाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांना संयोजक बनवण्यास सहमती दर्शवली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उघडपणे नितीश कुमार यांना स्वतःहून सर्वोत्तम दावेदार म्हटले आहे. 'सीपीएम'चे सरचिटणीस सीताराम येचुरी हेही नितीश कुमारांच्या बाजूने आहेत. 'सीपीआय'चे डी राजा यांनीही नितीश कुमार यांच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या इंडिया आघाडीच्या (INDIA Aghadi) समन्वय समितीमध्ये एक समन्वयक, एक अध्यक्ष आणि 9 सदस्यांचा समावेश असेल ज्यामुळे मित्रपक्षांमध्ये एकोपा निर्माण होईल. या आघाडीत प्रवक्त्यांची एक समितीही स्थापन करण्यात येणार असून, ही समिती प्रत्येक मुद्द्यावर आघाडीची एक बाजू मांडणार आहे. या आघाडीत समाविष्ट शिवसेना, तृणमूल, सपा, आरएलडी, जेएमएम, डीएमके आणि एमडीएमके यांसारखे मोठे पक्ष अजूनही कोंडीत आहेत.

राज्य पातळीवर समिती स्थापन करून जागावाटपाचा वाद मिटवावा, अशी यातील बहुतांश पक्षांची मागणी आहे. या आघाडीत आता एकूण 28 पक्षांचा समावेश आहे. BSP, INLD, AIUDF यासह आणखी 5 पक्षांचा समावेश करण्याची कसरत सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT