Nitish Kumar Sarkarnama
देश

Nitish Kumar News : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नितीश कुमार ब्रिटन दौऱ्यावर

Amol Sutar

Nitish Kumar News : लोकसभा निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. भाजपने 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे, तर काँग्रेसने 39 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे, तर एनडीएतील घटक पक्षांशी जागावाटपाचा तिढा सोडवण्याच्या मागे भाजप लागले आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार मात्र ब्रिटनला सहलीला निघून गेले आहेत. इंग्लंड आणि स्कॉटलंडची सहल करणार असल्याचे सांगितले जात आहे.

नितीश कुमार (Nitish Kumar) रात्री विमानाने लंडनला जाणार होते. त्याआधी ते दिल्लीला आले होते. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून बिहारमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, याबाबतची चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. त्यावेळी महाराष्ट्रातील प्रदेश भाजपचे नेतेही अमित शाहांच्या भेटीसाठी आले होते. त्यामुळे नितीश कुमार 12 मार्च रोजी मायदेशात परत आल्यानंतर भाजपला बिहार (Bihar) मधील जागावाटपाचा तिढा सोडवावा लागणार आहे.

नितीश कुमार यांचा ब्रिटनचा दौरा अधिकृत म्हणजेच सरकारी असल्याचे सांगितले जात असले तरी, ते वैद्यकीय उपचारासाठी परदेशात गेल्याचे समजते. नितीश कुमार यांना स्मृतिभ्रंश झाल्याची चर्चा दिल्लीत रंगली होती. जागावाटपाची बोलणी सुरू असताना ते ब्रिटनला निघून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच ते इंग्लंड व स्कॉटलंडमध्ये स्थायिक बिहारी लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. पाटणामध्ये डॉ. अब्दुल कलाम सायन्स सिटी प्रकल्पाच्या अनुषंगाने ब्रिटनमधील ‘सायन्स सिटीं’नाही नितीश कुमार भेटी देणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नितीश कुमार यांच्या जनता दलमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा अंदाज त्यांना आला होता. त्यामुळे राष्ट्रीय जनता दल (Janta Dal) किंवा भाजप दोन्हीपैकी कोणीही जनता दलाला भगदाड पाडू शकते, या भीतीने नितीश कुमार यांनी ‘एनडीए’मध्ये जाणे पसंत केल्याचे बोलले जाते. अशा राजकीय परिस्थितीमुळे नितीश कुमारांना पक्षावरील पकड सैल होऊ न देण्याचे आव्हान होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) जागावाटपाच्या प्रक्रियेत त्यांनी फारसा सहभाग न दाखविल्याचे त्यांच्या ब्रिटन सहलीवरून दिसून येत आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT