Prakash Javadekar Sarkarnama
देश

BJP Election Incharge : भाजपने जावडेकरांवर सोपवली अवघड; पण महत्त्वपूर्ण जबाबदारी

Vijaykumar Dudhale

New Delhi : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असून २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, काही राज्यांत सहप्रभारी निवडण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील दोन मराठी नेत्यांवरही पक्षाने महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यात विनोद तावडे यांच्याकडे बिहार, तर माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळची जबाबदारी देण्यात आली आहे. (Prakash Javadekar Election In-charge of Keral)

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. या नियुक्तीमध्ये सर्वांत महत्त्वाची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे. सध्या राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या बिहारची जबाबदारी तावडे यांच्या खांद्यावर असणार आहे. त्यांच्या मदतीसाठी राज्यसभेचे खासदार तथा झारखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांना देण्यात आले आहे. तावडे सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. (BJP Election Incharge )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रकाश जावडेकर यांच्याकडे भाजपने राहुल गांधी निवडून आलेल्या केरळ राज्याची जबाबदारी दिली आहे. केरळमध्ये मागील लोकसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. त्या राज्यातून राहुल गांधी यांच्यासह शशी थरूर यांच्यासारखे नेते मोदीलाटेतही निवडून आले आहेत. त्यामुळे जावडेकर यांच्यावर अवघड राज्याची जबाबदारी सोपवली आहे.

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत केरळमधून काँग्रेसचे 15 खासदार निवडून आले आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे दोन, तर केरळा काँग्रेसचा एक, सीपीआय (एम) पक्षाचा एक, तर क्रांतिकारी समाजवादी पक्षाचा एक खासदार निवडून आला आहे. भारतीय जनता पक्षाची पाटी केरळमध्ये कोरीच राहिली आहे.

या पार्श्वभूमीवर अवघड असलेल्या केरळची जबाबदारी जावडेकरांवर सोपविण्यात आली आहे. त्यांना केरळमध्ये कमळ फुलविण्याची अवघड कामगिरी पार पाडावी लागणार आहे. दरम्यान, जावडेकर यांनी या जम्मू-काश्मीर, तेलंगणा या राज्याचे प्रभारी म्हणून काम पाहिले. विशेष म्हणजे ते केंद्रीयमंत्रीही राहिले आहेत, त्यामुळे अवघड किल्ला सर करण्याची जबाबदारी जावडेकरांवर आली आहे.

राज्य आणि निवडणूक प्रभारी पुढीलप्रमाणे

१) अंदमान निकोबार : वाय सत्या. कुमार

२) अरुणाचल प्रदेश : अशोक सिंघल

३) बिहार : विनोद तावडे (प्रभारी), खासदार दीपक प्रकाश (सहप्रभारी)

४) चंदीगड : विजय रुपानी

५) दमण-दीव : पुरनेश मोदी (प्रभारी), दुष्यंत पटेल (सहप्रभारी)

६) गोवा : आशिष सूद

७) हरियाना : बिप्लब कुमार देव (प्रभारी), सुरेंद्र नागर (सहप्रभारी)

८) हिमाचल प्रदेश : श्रीकांत शर्मा (प्रभारी), संजय टंडन (सहप्रभारी)

९) जम्मू-काश्मीर : तरुण चूघ (प्रभारी), आशिष सूद (सहप्रभारी)

१०) झारखंड : लक्ष्मीकांत वाजपेयी

११) कर्नाटक : राधामोहन दास (प्रभारी), सुधाकर रेड्डी (सहप्रभारी)

१२) केरळ : प्रकाश जावडेकर

१३) लडाख : तरुण चूघ

१४) लक्षद्वीप : अरविंद मेनन

१५) मध्य प्रदेश : महेंद्र सिंह (प्रभारी), सतीश उपाध्याय (सहप्रभारी)

१६) ओडिशा : विजयसिंह तोमर (प्रभारी), लता उसेंडी (सहप्रभारी)

१७) पुदुच्चेरी : निर्मलकुमार सुराणा

१८) पंजाब : विजय रुपानी (प्रभारी), नरेद्र सिंह (सहप्रभारी)

१९) सिक्कीम : दिलीप जयस्वाल

२०) तमिळनाडू : अरविंद मेनन (प्रभारी), सुधाकर रेड्डी (सहप्रभारी)

२१) उत्तर प्रदेश : वैजयंत पांडा

२२) उत्तराखंड : दुष्यंतकुमार गौतम

२३) पश्चिम बंगाल : मंगल पांडे (प्रभारी), अमित मालवीय (सहप्रभारी), आशा लकडा (सहप्रभारी)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT