Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय नागरिकांना प्राण गमवावे लागल्याने भारताने या हल्ल्यानंतर चोख प्रत्यत्तर देण्यास सुरवात केली आहे. पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबविताना १३ दहशतवादी स्थळांवर मंगळवारी मध्यरात्री जोरदार हल्ला चढविला. या एअर स्ट्राइकची सर्वांनाच जोरदार धडकी बसली आहे. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच भारताने पाकचे ड्रोन हवेतच पडल्याने कराचीपासून ते अगदी इस्लामाबादपर्यंत केलेल्या कारवाईने पाकिस्तान हादरला आहे. त्याचमुळे आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची झोप उडाली आहे. त्याचमुळे त्यांनी भयभयीत होऊन संपूर्ण कुटुंबासह कराची शहर सोडून पलायन केल्याचे समजते.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी मध्यरात्री भारताने 13 दहशतवादी स्थळांवर मंगळवारी मध्यरात्री जोरदार हल्ला चढविला. या मध्ये मोठया संख्येने दशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतातील काही शहरावर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भारताने त्यांची सर्वच ड्रोन हवेतच पाडली. त्यानंतर भारताने हवाई ड्रोन हल्ले केले. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला असल्याचे दिसत आहे.
भारतीय क्षेपणास्त्रांनी लाहोर, सियालकोट आणि कराचीसह पाकिस्तानमधील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. भारतीय लष्कराने अनेक लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला केला. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारताने केलेल्या या कारवाईमुळे दाऊद इब्राहिम कराची सोडून पळून गेला आहे. दाऊद इब्राहिमसोबत त्याचे साथीदार अनीस आणि छोटा शकील यांनीही कराची सोडले आहे. त्यासोबतच कुटुंबाला घेऊन दाऊद कराची बाहेर पळाला असल्याची माहिती सूत्राने दिली.
दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आपल्या साथीदारांसह जीव वाचवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला आहे. त्याने कराचीतून पळ काढला आहे. त्याला कराचीतून बाहेर काढण्या मागे आयएसआय असल्याचे म्हटलं जात आहे. त्याला पाकिस्तानमध्येच दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहितीही सुत्रांकडून मिळत आहे. दाऊदचा संपूर्ण परिवार या हल्ल्यामुळे घाबरला आहे. त्यात पत्नी महजबीन, मुलगा मोईन, त्याचा छोटा भाऊ अनिस इब्राहीम, दाऊदचा डावा हात छोटा शकील यांच्यासह त्याने कराची सोडली असल्याचे समजते.
दरम्यान, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. 7 मे च्या रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानची झोप उडवली. पाकिस्तानच्या नऊ शहरातील दहशतवादी अड्ड्यांवर भारताने एअर स्ट्राईक केला. या कारवाईत जवळपास 100 दहशतवादी ठार मारले गेल्याची माहिती ही समोर आली आहे. त्याच बरोबर भारताने पाकिस्तानची रडार सिस्टम ही उद्धवस्त करून टाकली होती. भारताने केलेल्या या आक्रमक कारवाईमुळे पाकिस्तानात असलेल्या दाऊदच्या पायाखालची वाळू सरकली असून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी त्याची धावपळ सुरु असल्याचे समजते.
दरम्यान, 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री पाकिस्तानकडून पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले गेले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारताने हे ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.