देश

Kapil Sibal News : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी कपिल सिब्बलांचं 'EVM'बाबत मोठं विधान, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. 1 जून रोजी सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे आणि 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल आहे. यापूर्वीच काँग्रेस नेते आणि राज्यभा खासदार कपिल सिब्बल यांनी ईव्हीएम बाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

कपिल सिब्बल यांनी म्हटले की, खूप लोक म्हणत आहेत की या यंत्रांशी छेडछाड केली जाऊ शकते. यामुळे आम्ही हे सुनिश्चित करू इच्छितो की छेडछेडीची कोणतीही शक्यता नसावी.

कपिल सिब्बल(Kapil Sibal) म्हणाले, की आम्ही हेही म्हणत नाही की छेडछाड केली गेली आहे आणि हेही की छेडछाड झालेली नाही. त्यांनी म्हटले कोणत्याही यंत्राशी छेडछाड केली जाऊ शकते. आम्हाला विश्वास आहे, परंतु मतदारांसाठी हे सुनिश्चित केले गेले पाहिजे की त्यांचे मत त्याच उमेदवारास गेले आहे, ज्यास त्याने मतदान केले आहे. जर मतांची संख्या आणि वेळेमध्ये फरक असेल तर तुम्हाला माहिती होईल. मी ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांसाठी हा चार्ट बनवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कपिल सिब्बल म्हणाले की, तुम्ही सर्वजन जाणतात की 4 जून रोजी मतदानाचे निकाल येतील. यासाठी मी जनता आणि राजकीय पक्षांना जागरूक करून इच्छित आहे, जेव्हा ईव्हीएम(EVM) उघडले जातील तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे. त्यामुळेच मी सर्व राजकीय पक्षांसाठी आणि मतमोजणी प्रतिनिधींसाठी एक चार्ट बनवला आहे.

कपिल सिब्बल यांनी सांगितले की, या चार्टमध्ये सीयू(कंट्रोल यूनिट) नंबर, बीयू(बॅलेट यूनिट) नंबर आणि व्हीव्हीपॅट आयडी असेल. तिसरा कॉलम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तिसऱ्या कॉलममध्ये 4 जून 2024 लिहिले आहे आणि ज्यावेळी मशीन उघडली जाईल ते खाली लिहिले आहे. जर या वेळेत काही फरक आहे तर तुम्हाला माहिती होईल की मशीन आधीच कुठंतरी उघडली गेली आहे. मग कंट्रोल यूनिटचा सीरियल नंबरही लिखित स्वरुपात येथे येईल, तुम्हाला तोही जुळवून बघायचा आहे.

सिब्बल पुढे म्हणाले की, जेव्हा एकूण मतदानाची मतं येतात तेव्हा ते लक्षपूर्वक बघा, जेणेकरून जेव्हा मोजणीत जास्त मतं असतील तेव्हा अडचण पुन्हा येऊ नये. दोन गोष्टी लक्षात ठेवा, जोपर्यंत वरील कॉलमध्ये व्हेरिफिकेशन होणार नाही, तोपर्यंत निकालाचे बटण दाबू नये आणि जर त्या वेळेत आणि निकालाच्या वेळेत अंतर आहे तर काहीतरी गडबड आहे. तसेच कपिल सिब्बल म्हणाले की, मला वाटतं सर्व राजकीय पक्षांनी आणि तिथे बसलेल्या सर्व उमेदवारांनी पहिला कॉलम लक्षपूर्वक पाहावा आणि त्यानंतर तो उघडावा.

वेळोवेळी विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. या निवडुकीतही अनेक नेत्यांची ईव्हीएमबाबत वक्तव्य आली आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांनीही एका पत्रकारपरिषदेत सांगितले होते की, जर ईव्हीएमशी छेडछाड केली गेली तरच भाजपला 400 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT