PM Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

BJP Second Candidate List: भाजपची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रात पुन्हा धक्कातंत्र, 'या' नव्या चेहऱ्यांना उमेदवारी

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यावर उर्वरित जागेबद्दल काय निर्णय घेतला, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

Deepak Kulkarni

New Delhi : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काही दिवसांपूर्वीच पहिली यादी जाहीर केल्यावर उर्वरित जागेबद्दल काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.आता भाजपकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

यात नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) ,जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून केंद्रीय मंत्री भारती पवार, भिवंडीतून कपिल पाटील तर दक्षिणमधून डॉ. सुजय विखे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ, बीडमधून प्रीतम यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत भाजपनं आपलं धक्कातंत्र कायम ठेवलं आहे.

लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने काही दिवसांपूर्वी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात महाराष्ट्राला स्थान देण्यात आलेले नव्हते. भाजपने पहिल्या यादीत तब्बल 195 उमेदवारांची नावे घोषित केली होती. यात उत्तर प्रदेशात वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इतरांच्या नावांची घोषणा केली गेली. गुजरातच्या गांधीनगर येथून गृहमंत्री अमित शाह, तर सुषमा स्वराज यांची कन्या बांसरी स्वराज यांना उमेदवारी देण्यात आली होती.

आता भाजपने दुसऱ्या यादीत नंदूरबार- हिना गावित, धुळे -सुभाष भामरे, जळगाव- स्मिता वाघ, रावेर- रक्षा खडसे, अकोला- अनुप धोत्रे, वर्धा- रामदास तडस, नागपूर- नितीन गडकरी, चंद्रपूर- सुधीर मनगुंटीवार, नांदेड- प्रताप पाटील चिखलीकर, जालना- रावसाहेब दानवे, दिंडोरी- भारती पवार, भिवंडी- कपिल पाटील, मुंबई उत्तर- गोयल, मुंबई उत्तर पूर्व - मिहीर कोटेचा, पुणे - मुरलीधर मोहोळ, अहमदनगर -सुजय विखे पाटील, बीड- पंकजा मुंडे, लातूर- सुधाकर शृंगारे, माढा - रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगली- संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने(BJP) महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी काही खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह मनोज कोटक, प्रीतम मुंडे, उन्मेष पाटील यांचा समावेश आहे. गोपाळ शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

भाजपने पहिल्या यादीत उत्तर प्रदेश 51, पश्चिम बंगाल 20, मध्य प्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगणा 9, आसाम 11, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू कश्मीर 2, उत्तराखंड 3, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1, त्रिपुरा 1, अंदमान निकोबार 1, दमन दीव 1 अशा एकूण 195 जागांचे उमेदवार भाजपने जाहीर केले होते.

या यादीत 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांचाही समावेश होता. त्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही समावेश होता. या यादीत 27 अनुसूचित जाती आणि 18 एसटी उमेदवार आहेत. 195 पैकी 57 ओबीसी उमेदवार उभे करण्यात आले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT