Mumbai News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने भाजपवर त्यातल्या त्यात प्रामुख्याने मोदी- शाहांवर टीकेची झोड उठवत आहेत. भाजपच्या ध्येयधोरणांवर ते सडकून टीका करत आहेत. याचदरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवरून ठाकरेंनी भाजपवर तिखट वार करतानाच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांना त्यांच्यासोबत येण्याची ऑफर दिली होती.
एकदा नव्हे दोनदा दिलेल्या ऑफरमुळे ठाकरे आणि गडकरी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. यातच ठाकरेंच्या ऑफरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप (Bjp) नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता नितीन गडकरींनीच उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ऑफरनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच भाजप नेते नितीन गडकरी काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गडकरी म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे. भाजपमध्ये निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ठाकरेंनी भाजप नेत्यांची काळजी करण्याची गरज नाही हेही गडकरींनी सुनावले.
भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव नव्हते तसेच महाराष्ट्रातील कोणत्याच उमेदवाराचे नाव या यादीतून जाहीर करण्यात आले नाही. यावरून विरोधी पक्षांना हा एक मुद्दाच मिळाला.
गडकरींचं नाव नसल्याने विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 'ज्यांनी भाजप रुजविण्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही. नितीनजी सोडून द्या भाजप, या महाविकास आघाडीत आम्ही तुम्हाला निवडून आणतो', अशी ऑफर त्यांना देण्यात आली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना दिलेल्या ऑफरवरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, 'ज्या पक्षाचा बॅन्डबाजा वाजला आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या राष्ट्रीय नेत्याला ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतील व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या, असं म्हटल्यासारखं आहे'. गडकरी हे आमचे मोठे नेते आहेत. महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल तेव्हा त्यांचे नाव जाहीर होईल, ते नागपूरमधून लढतात. ज्यावेळेस पहिली यादी झाली, त्यावेळी महाराष्ट्रात आमच्या महायुतीचा निर्णय झाला नसल्याने आम्ही चर्चा केली नाही.
महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर चर्चा होईल, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल. यामुळे स्वत:ला मोठं दाखविण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत, त्यांचं हसं होतंय, असे फडणवीस म्हणाले.
(Edited by Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.