Rajasthan Assembly Election Sarkarnama
देश

Rajasthan Assembly Election : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी वसुंधरा राजे की 'योगी'...; भाजप पुन्हा धक्कातंत्र वापरणार ?

Deepak Kulkarni

Rajasthan Assembly Election Results 2023 : पाच राज्यांपैकी चार राज्यांचा निकाल रविवारी जाहीर होत आहे.अद्याप अंतिम निकाल स्पष्ट झाले नसले तरी विजय पराभवाचा कल समोर येऊ लागला आहे. यात एक्झिट पोलमध्ये काँग्रेसच्या पारड्यात राहिलेले राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे, तर तेलंगणात बीआरएसला पराभवाचा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, आता विजयाच्या वाटचालीनंतर आता राजस्थान आणि मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून खलबतं सुरू झाले आहेत.

राजस्थान विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास भारतीय जनता पक्ष (BJP) 111जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासह राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. राजस्थानची निवडणूक भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा न देता लढवली होती. त्यामुळे भाजप नेतृत्व पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत नवीन चेहरा पुढे आणून त्याच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवणार, की वसुंधरा राजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे याविषयी चर्चांना उधाण आले आहेत.

वसुंधरा राजे (Vasundhara Raje)आणि भाजप असं समीकरण आजवर कायमच राजस्थानमध्ये पाहायला मिळाले आहेत. तसेच भाजपच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून 2003 पासून राजस्थानमध्ये त्यांचाच चेहरा पुढे करण्यात आला आहे. भाजपचा आजपर्यंतचा फंडा हा कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना अगोदर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करत आलेला आहे, पण मोदी शाह यांच्या काळात भाजपनं धक्कातंत्र अवलंबिण्यात पाहायला मिळते, पण या वेळी राजस्थानसारख्या मोठ्या राज्यात धोका पत्करून भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला नव्हता.

याच पार्श्वभूमीवर राजस्थानच्या निवडणुकीत अनेक चेहऱ्यांची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. अशात राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि महंत बालकनाथ योगी (Mahant Balaknath) यांच्या नावे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. मात्र, भाजप नेहमीच धक्कातंत्र वापरत आला आहे. त्यामुळे राजस्थानमध्येही नवीनच चेहरा मुख्यमंत्री पदासाठी देणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजस्थानमध्ये भाजपकडून खासदार असलेल्या महंत बाबा बालकनाथ योगी यांना विधानसभा निवडणुकीत उतरवले होते. त्यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार चर्चा आहे. याचवेळी वसुंधरा राजे, जयपूर राजघराण्यातील दिया कुमारी, राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी हेही मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

खासदार महंत बाबा बालकनाथ योगी यांना भाजपने विधानसभा निवडणुकीत उतरवल्यानंतर त्यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा आहे. ते तिजारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आहेत. अशोक गेहलोत यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बालकनाथ हा दुसरा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून समोर आला आहे. (Rajasthan Assembly Election Results 2023)

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं नावं मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करून भाजपने 2017 ला सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आणि योगींना मुख्यमंत्रिपदासाठी वाढती पसंती भाजपचा निर्णय योग्य ठरला असल्याची पोचपावतीच असल्याचेही सिद्ध झाले आहे. आता पुन्हा एकदा भाजप 2023 ला राजस्थानमध्ये 'योगी' कार्ड खेळण्याची शक्यता आहे.

'या' नेत्यांच्या नावाची चर्चा...

राजस्थानमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधरा राजे, महंत बालकनाथ यांच्याशिवाय गजेंद्र सिंह शेखावत, भूपेंद्र चौधरी, अर्जुनराम मेघवाल, अश्विनी वैष्णव किंवा सुनील बन्सल यापैकी कोणत्याही बलाढ्य नेत्यांना भाजप नेतृत्व करण्यासाठी संधी देऊ शकते. तसेच अनेक जाहीर सभांमध्ये पीएम मोदींनी अर्जुनराम मेघवाल यांचे नाव ज्या पद्धतीने घेतले, त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा दावाही मजबूत मानला जात आहे.(BJP)

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT