Mumbai News : मुंबईतील महापालिका निवडणुकीची घोषणा दिवाळीनंतर होणार आहेत. त्याची तयारी सर्वच पक्ष करीत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून या महापालिकेवर एकसंध शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात महायुती आक्रमक झाली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना व भाजपने मुंबई महापालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी आता मोठे प्लॅनिंग केले आहे. विशेषतः येत्या काळात उद्धव ठाकरेंविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'गेमचेंजर' खेळी केली आहे.
मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी आणि पक्षाचा आधार भक्कम करण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेने स्थानिय लोकाधिकार समितीची स्थापना केली आहे. त्या समितीची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यावर सोपवली मराठी माणसांना एकत्र करण्याची जबाबदारी माजी मंत्री व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्याकडे तर शिंदे यांचे पुत्र, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे समितीच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे..
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील कामगार वर्गाला शिवसेनेसोबत जोडण्यासाठी, पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी स्थानिय लोकाधिकार समितीची स्थापना केली होती. शिवसेनेत ( Shivsena) 2022 मध्ये उभी फूट पडली त्यावेळी सेनेच्या बहुतांश आमदार, खासदारांनी शिंदेंना साथ दिली. यानंतर आता शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का देण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यासाठी त्यांनी स्थानिय लोकाधिकार समितीची स्थापना मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात करण्यात आली.
स्थानिय लोकाधिकार समितीची स्थापना करीत येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आव्हान देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. या माध्यमातून मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असलेले जवळपास ५० माजी नगरसेवकांना फोडले आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा स्थानिय लोकाधिकार समिती महासंघ हा संघटनेचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक निवडणुकीत स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळेच आता शिंदे यांनीदेखील स्थानिय लोकाधिकार समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षपद माजी खासदार गजानन किर्तीकर यांना देण्यात आले आहे. तर शिंदे यांचे पुत्र, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे समितीच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
त्यामुळे येत्या काळात या समितीच्या माध्यमातून शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुंबई कशाप्रकारे नेटवर्क उभारले जाणार यावर यश-अपयश अवलंबुन असणार आहे.शिंदेंच्या या स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्षपद गजानन किर्तीकर यांच्याकडे देण्यात आले आहे. ते सध्या ८२ वर्षांचे आहेत. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं दोनदा प्रतिनिधीत्व त्यांनी केले आहे. त्याआधी ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.
युती सरकारच्या काळात आधी राज्यमंत्री आणि मग कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेना एकसंध असताना स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे येत्या याकाळात त्यांच्या या अनुभवाचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात याचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कितपत फायदा हॊणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.