devendra fadnavis And eknath shinde sarkarnama
महाराष्ट्र

Dharashiv Politics : 'इगो' दुखावल्यानंतर महायुतीतल्या दोन नेत्यांमध्येच टोकाचा संघर्ष, मुंबईतल्या 'त्या' एका बैठकीनं धाराशिवचं राजकारणच बदललं !

Rana Patil Sarniak patch-up News : गेल्या काही दिवसापासून निधीवाटपावरून झालेले मतभेद दूर ठेवून या दोन नेत्याने येत्या काळात एकत्र निवडणूक लढविण्याचे प्लॅनिंग केले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस बाजूला सारून येत्या काळात महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. गेल्या काही दिवसापासून निधीवाटपावरून झालेले मतभेद दूर ठेवून या दोन नेत्याने येत्या काळात एकत्र निवडणूक लढविण्याचे प्लॅनिंग केले असून त्याला भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या फेसबुकवरील पोस्टने दुजोरा भेटला आहे.

धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन पक्षामध्ये कायमच मतभेद होते. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून या दोन पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. विशेषतः निधीवाटपावरून दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात शहरात बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. विशेषतः या दोन पक्षात जिल्हा नियोजन समितीतील निधी आणि रस्ते विकासाच्या निधीवरून पालकमंत्री प्रताप सरनाईक व भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील या दोन नेत्यांमध्ये धुसफूस सुरू होती.

त्यानंतर आता येत्या काळात निवडणुका होणार असल्याने धाराशिवमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (Shivsena) नेते आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यातील संभाव्य दिलजमाईची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे. 'दिशा स्पष्ट निर्धार ठाम' अशी फेसबुक पोस्ट करीत राणाजगजितसिंह पाटील यांनी केल्याने या चर्चांना बळ मिळाले आहे.

जिल्हा नियोजन समितीतील निधी आणि रस्ते विकासाच्या निधीवरून दोन्ही नेत्यांमध्ये धुसफूस सुरू होती. मात्र, आता मुंबईत दोन्ही पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीस भाजप (BJP) व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हास्तरीय नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आगामी नगरपरिषद निवडणूक एकत्र लढवण्यावर एकमत झले असल्याचे समजते. या नेतेमंडळींने येत्या काळात महायुतीचे संकेत दिले आहेत. या बैठकीनंतर पाटील यांनी केलेल्या पोस्टमुळे धाराशिवच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते या निमित्ताने एकत्रीत येऊन येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्याचा निर्धार करण्यात आला. त्यामुळे येत्या काळात दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT