Babasaheb Patil,  Sarkarnama
महाराष्ट्र

NCP minister resignation: तब्येतीच कारण फक्त निमित्त : एका विशेष व्यक्तीमुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्याला सोडावे लागले पालकमंत्रीपद?

guardian minister post news : गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी तब्येतीच कारण सांगत बुधवारी पालकमंत्रिपद सोडले असले तरी त्याच्या मागे वेगळेच कारण असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात महायुतीचे सरकार येऊन जवळपास ११ महिन्याचा कालावधी झाला आहे. या कालावधीत तीन पालकमंत्र्यांनी आपल्याकडील पदभार सोडल्याचे पुढे आले आहे. सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याकडे असलेले वाशिमचे पालकमंत्रीपद तब्येतीच कारण सांगत सोडले होते. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागली होती. तर त्यानंतर मंत्री संजय सावकारे यांना पालकमंत्री पद सोडावे लागले होते. तर आता गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडावे लागले आहे, त्यांच्या जागी आता इंद्रनील नाईक कारभार पाहणार आहेत.

गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी तब्येतीच कारण सांगत बुधवारी पालकमंत्रिपद सोडले असले तरी त्याच्या मागे वेगळेच कारण असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. पाटील यांचे काही विशेष व्यक्ती ही गोंदिया जिल्हा नियोजन विभागात बसून कामांचे नियोजन करीत होते. ही व्यक्ती स्थानिकांना काम न देता इतरांना देत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठाकडे करण्यात आल्या होत्या. त्याचा फटका पाटील यांना बसला असल्याची चर्चा आहे.

यापूर्वीचे गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या कार्यकाळात जिल्हा नियोजनातून कामांचे वाटप करतांना स्थानिक पक्ष नेतृत्वाला डावलत काम केल्याची चर्चा होती. तीच चर्चा गेल्या 15 दिवसापासून गोंदियात सुरु होती. त्यातच गेली काही दिवसापासून आत्राम यांनी केलेली चूक पाटील यांच्याकडूनही झाल्याचे प्रशासकीय व राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांचे काही विशेष व्यक्ती ही गोंदिया जिल्हा नियोजन विभागात बसून कामांचे नियोजन करतांना स्थानिकांना ते काम न देता इतरांना देत असल्याचे व लोकप्रतिनिधींचेही कामांना टक्केवारीकरीता थांबवित असल्याची चर्चा होती. त्यातच आत्राम यांनी केलेली चूक पाटील यांच्याकडूनही झाली. त्यामुळेच पाटील यांना पालकमंत्रीपद सोडावे लागल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडल्यानंतर आता त्यांची जबाबदारी आता इंद्रनील नाईक (Indraneel Naik) यांच्याकडे सोपवली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जिल्ह्यात न येण्याऱ्या पालकमंत्र्यांचे कान टोचले होते. त्यानंतर हा बदल झाला असल्याची चर्चा आहे.

तब्येतीचे कारण देत बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्री पद सोडले आहे. काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे सातत्याने आपल्याला लांबचा प्रवास होत नाही, असे त्यांनी अजित पवार यांना सांगितले होते. मात्र, त्याच्या मागे वेगळेच कारण असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT