A farmer inspects his flood-damaged crops in Maharashtra after heavy rains. The state government has promised crop loss compensation before Diwali. sarkarnama
महाराष्ट्र

Farmers Relief : अतिवृष्टी व पूर बाधीत शेतकऱ्यांना पॅकेजची रक्कम कशी मिळणार? निकष काय? शासनानं जाहीर केली नियमावली

Farmers Relief: गेल्यावर्षी झालेल्या ओल्या दुष्काळात बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनानं पॅकेज आणि त्याचे दरही जाहीर केले होते. पण त्याच्या वितरणासाठी आता नियमावली जाहीर केली आहे.

Amit Ujagare

Farmers Relief: राज्यात गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात अतवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं तसंच गोठ्यातील पाळीव प्रण्यांचं मोठं नुकासान झालं होतं, तर अनेकजण बेपत्ताही झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे शेतीपूरक जोडधंदे किंवा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. या ओल्या दुष्काळात बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनानं पॅकेज आणि त्याचे दरही जाहीर केले होते. पण आता शेतकऱ्यांना ही मदत कशा प्रकारे देण्यात यावी याची सुधारित नियमावली शासनानं जाहीर केली आहे.

शासनाच्या सुधारित नियमावलीनुसार, २७ मार्च २०२३ रोजी शासनानं निश्चित केलेल्या पूरबाधितांसाठीच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता,

  1. अल्प, अत्यल्प भूधारक तसंच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व आपतग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र राहतील.

  2. प्रत्येक पशुपालकांना कमाल ३ मोठ्या दुधाळ व ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.

  3. प्रत्येक पशुपालकांना कमाल ६ ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.

  4. प्रत्येक पशुपालकांना कमाल ३० लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.

  5. प्रत्येक पशुपालकांना कमाल १०० कुक्कुट पक्षांसाठी १०,००० रुपयांच्या मर्यादेत याऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व कुक्कुटपक्षी मदतीसाठी पात्र राहतील.

मृत/बेपत्ता पशुधनाची खातरजमा कशी करणार?

  • अतिवृष्टीत/पुरात मृत पावलेल्या/वाहून गेलेल्या पशुधनाची किमान खालीलपैकी एका ठिकाणी नोंद असणं आवश्यक राहील.

  • राष्ट्रीय डिजीटल पशुधन अभियानांतर्गत (NDLM) भारत पशुधन अॅपवर नोंदणी.

  • २१ वी पशुगणनेतील नोंद.

  • पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या नियतकालीक लसीकरणाची नोंदवहीतील नोंद / ऑनलाईन नोंदी.

  • विमा कंपनीकडील नोंद.

  • दुध अनुदान योजनेत समाविष्ट असलेले पशुधन व त्यांचे मालक याची नोंद.

पंचनामा

मृत पशुधनाच्या संदर्भात शवविच्छेदन अहवाल मदतीसाठी ग्राह्य धरण्यात यावा

वरील २ मधील (1) ते (v) मध्ये नमूद असलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाणी नोंद असलेल्या मृत झाल्यामुळे अथवा पशुधन वाहून गेले असल्यामुळे त्याचा शोध/तपास लागत नाही, अशा पशुधनाच्याबाबतीत संबंधित पशुपालकास मदत मिळण्यासाठी खालील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात यावा.

  1. स्थानिक पशुधन विकास अधिकारी,

  2. तलाठी,

  3. पोलीस पाटील/सरपंच,

  4. ग्राम पातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक,

  5. संबंधित पशुधनाचे मालक

जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणे

स्थानिक तलाठी मृत/वाहून गेलेल्या पशुधनाच्या नुकसानीपोटी जाहीर करण्यात आलेली मदत मिळण्यासाठी मृत पशुधनाच्या संदर्भात शवविच्छेदन अहवाल किंवा बेपत्ता पशुधनाच्या बाबतीत पंचनाम्याची प्रत संबंधित तहशीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.

सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना

  1. मृत अथवा बेपत्ता असलेल्या विमाकृत पशुधनास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई अनुज्ञेय असल्यास संबंधित पशुपालक मदतीसाठी पात्र राहणार नाही.

  2. मृत अथवा बेपत्ता असलेल्या पशुधनाच्या मालकाची ओळख निश्चित करण्याची जबाबदारी तलाठी व पोलीस पाटील यांची राहील.

  3. मृत अथवा बेपत्ता असलेल्या पशुधनाच्या मालकाचे आधार सलग्नित बँकखात्याचा तपशील पंचनामा/शवविच्छेदन अहवालासह तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिका-यांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT