Dapoli Sarkarnama
कोकण

Ratnagiri News : वडिलांची इच्छा मुलगा पूर्ण करणार ; आज वाटणार हत्तीवरून साखर...

Distribution of Sugar on Elephants : खर्च भाजप पदाधिकाऱ्याचा पण बहुमान कारसेवकांचा

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना आज दि. 22 जानेवारी रोजी होणार आहे, त्याची तयारी देशभर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हत्तीवरून साखर वाटली जाणार आहे.

दापोली येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक व भाजपाचे प्रदेश युवा कार्यकारणी सदस्य जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांनी हत्तीवरून साखर वाटत ही शोभायात्रा दापोली येथे आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या सगळ्याचा खर्च भाजपचे पदाधिकारी अक्षय फाटक यांनी केला असला तरी हत्तीवरून साखर वाटण्याचा बहुमान अयोध्येत सहभागी झालेल्या कारसेवकांना दिला जाणार आहे.

रात्री उशिरा खास कर्नाटक येथून हत्ती दापोलीत दाखल झाला आहे. 1996 ते 99 च्या दरम्यान अक्षयचे वडील दिवंगत श्रीधर फाटक हे विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी अयोध्या येथे श्रीराम मंदिर (Ram Mandir) होईल त्यावेळेला आपण हत्तीवरून साखर वाटू असा पण केला होता. आपल्या वडिलांची ही इच्छा आता अक्षय आणि आनंद हे दोन्ही भाऊ व त्यांचे कुटुंब पूर्ण करणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अक्षय फाटक याची आई आशा फाटक यांनी आपली दोन्ही मुले वडिलांची ही इच्छा पूर्ण करत आहेत, यासाठी अक्षयने पुढाकार घेतला आहे याचा मला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली. यासाठी खास कर्नाटकवरुन गजराजाच आगमन झाले आहे. गजराज कर्नाटक येथून दापोलीत दि. 21 जानेवारी रोजी रात्री दाखल झाला. हत्तीवरून साखर वाटण्याचा बहुमान हा कारसेवकांना देण्यात येणार आहे.

ही भव्य शोभायात्रा दापोली जालगाव परिसरातून निघणार आहे. अक्षयचे काका विश्वास फाटक हेही त्यावेळेला अयोध्या येथील कारसेवेत सहभागी झाले होते. याबाबत बोलताना अक्षय फाटक यांनी सांगितले की, या सगळ्या शोभायात्रा सोहळ्याचा खर्च केवळ आपण करणार आहोत. हा सगळा बहुमान अयोध्या येथे त्या वेळेला गेलेल्या कारसेवकांचा आहे.

त्यामुळे हत्ती कोणी आणला हे महत्त्वाचं नाही पण त्या दिवशी हा सोहळा कारसेवकांचे उपस्थितीत साजरा होईल. हत्तीवरून साखर वाटण्याचा हा बहुमान उपस्थित कारसेवकांना दिला जाणार आहे. अशी माहिती अक्षय फाटक यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT