Uddhav Thackeray Eknath Shinde sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : शिंदेंचा खासदार ठाकरेंकडे पुन्हा परतणार? मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिवसनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीपूर्वी ( Lok Sabha Election 2024 ) अनेक राजकीय उलथापालथ देशासह महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह त्यांना मिळालं. त्यानंतर अनेक आमदार आणि खासदारांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. अशातच आता शिंदेंच्या शिवसेनेतील एक खासदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.

2022 नंतर राज्यातील राजकीय चित्र बरेच बदललं आहे. 2022 मध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. यानंतर 2023 मध्ये अजित पवारांनी ( Ajit Pawar ) शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शवला. आता महायुतीत तीन पक्ष सहभागी झाले आहेत. त्यामुळे अनेकांना तिकिट मिळेल का नाही? अशी चिंता लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून ते मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात असल्याचंही बडगुजर यांनी म्हटलं आहे. सुधाकर बडगुजर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सुधाकर बडगुजर म्हणाले, "हेमंत गोडसे हे मिलिंद नार्वेकर यांना भेटले आहेत. मला नार्वेकरांनी सांगितलं की, 'हेमंत गोडसे आपल्याकडे फेऱ्या मारत आहेत.' मी म्हटलं, गोडसेंना घेतलं, तर नाशिकमध्ये फटाके फुटतील. पदाधिकारी चिडलेले असल्यामुळे ते थांबणार नाहीत. त्यामुळे हेमंत गोडसेंना घेऊ नका."

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यातील वाद समोर आला आहे. नाशिकमध्ये रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी दिनकर पाटील आणि हेमंत गोडसे एकत्र आले होते. तेव्हा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सुद्धा उपस्थित होते.

यावेळी 'माझ्यासमोर उभा राहू नको, आडवाच करीन', अशा शब्दांत भाजपाचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना सुनावले. हा वाद वाढू नये यासाठी दानवे यांनी मध्यस्थी करीत 'तुमचा वाद मिटवयाला मला पुन्हा यावे लागेल,' असे म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT