Manoj Jarange patil devendra fadnavis  sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: फडणवीसांच्या 'होम डिपार्टमेंट'चा जरांगेंबाबत मोठा निर्णय; सुरक्षेसाठी 24 तास...

Manoj Jarange Patil Police Security : जरांगे-पाटलांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला आहे. मनोज जरांगेंनी आंदोलनाच्या माध्यमातून कुुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मोठा लढा उभारला आहे. आंदोलनं,विक्रमी गर्दीच्या सभांमधून त्यांनी सरकारला जेरीस देखील आणले आहे.

याचवेळी आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी असा संघर्ष उफाळून आला आहे. त्यात मंत्री छगन भुजबळ आणि जरांगेंकडून एकमेकांना सतत कडवे आव्हान दिले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांना सरकारी सुरक्षा मिळणार आहे. यासाठी दोन शस्त्रधारी पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात असणार आहेत.

मराठा समाजाकडून मनोज जरांगेंना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर गुप्तवार्ता विभागाच्या आदेशानंतर मनोज जरांगेंना 24 तास सुरक्षा देण्यात आली आहे. जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी 2 शस्त्रधारी पोलीस 24 तास तैनात असणार आहेत.(Maratha Reservation)

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

सात-आठ महिन्यांपूर्वी अंतरवाली सराटी येथे पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं नेतृत्व समोर आलं होतं. जरांगे-पाटलांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र केला. जरांगे-पाटलांनी केलेल्या उपोषणापुढं सरकारही झुकले होते.

अशातच जरांगेंनी कुणबी नोंद सापडलेल्यांना ओबीसी (OBC) प्रमाणपत्र देण्यासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रा काढली होती. जरांगेंनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा दिला होता. पण, वाशी येथेच जरांगे-पाटलांची यात्रा थांबवण्यात आली. चर्चेनंतर जरांगे-पाटलांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्या.

जरांगे-पाटलांकडून पुन्हा उपोषण करण्याचा इशारा

"राज्य सरकारनं येत्या 15 दिवसांत सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. 9 फेब्रुवारीपर्यंत सरकारला मुदत आहे. या काळात कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करणार," असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिला आहे.

Edited By : Akshay Sabale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT