Ambadas Danve  Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : पद गेल्यानंतर काढलेली सुरक्षा परत मिळवण्यासाठी अंबादास दानवेंचा स्टंट; धमकीचा आरोप असलेल्या भाजप कार्यकर्त्याचाच पलटवार!

Amol Gonde BJP worker reaction News : अंबादास दानवे यांना झोकात राहायची सवय आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद गेल्यानंतर काढण्यात आलेली सुरक्षा पुन्हा मिळवण्यासाठी अंबादास दानवे यांनी केलेला हा स्टंट आहे.

Jagdish Pansare

Shivsena-BJP : अंबादास दानवे यांना झोकात राहायची सवय आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद गेल्यानंतर काढण्यात आलेली सुरक्षा पुन्हा मिळवण्यासाठी अंबादास दानवे यांनी केलेला हा स्टंट आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात दानवे यांनी एका कार्यकर्त्याला लाथ घातली होती, आता आमच्या नेत्याची काॅलर धरली. याबद्दल एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जाब विचारला, तर तो माझा गुन्हा आहे का? असा सवाल करत अमोल गोंदे नावाच्या भाजप कार्यकर्त्याने केला.

मी रात्री रील पहात असताना कल्याणनाना गायकवाड यांची अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी काॅलर धरल्याचा व्हिडिओ माझ्या समोर आला. त्यातून मी रात्री उशीरा त्यांना फोनवरून फक्त तुम्ही कल्याण नानांची काॅलर का धरली? याचा जाब विचारला. पण मी कुठेही त्यांना कापून टाकू, फाडून टाकू किंवा शिवीगाळ केलेली नाही, असा दावाही गोंदे यांनी केला.

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोमवारी आपल्याला गेल्या चार-पाच दिवसापासून जीवे मारण्याची धमकी देणारे फोन येत असल्याचे सांगितले. या संदर्भातील काॅल डिटेल्स, मोबाईल क्रमांक धमकी देतांना वापरलेली भाषा याची माहिती अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रातून दिली. त्याशिवाय दानवे यांचे कार्यालयीन स्वीय सहाय्यक गणेश म्हस्के यांच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

जीवे मारण्याची धमकी देणारा व्यक्ती हा छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीचे सभापती कल्याण गायकवाड यांचा समर्थक आणि भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले. अमोल गोंदे असे या व्यक्तीचे नाव असून त्याने अंबादास दानवे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. अंबादास दानवे यांना आपण फोन केल्याची कबुली देतानाच फक्त कल्याणनाना गायकवाड यांची काॅलर तुम्ही का धरली? याचाच जाब आपण त्यांना विचारला. त्यांनी आधी माझे फोन कट केले, जेव्हा उचलला तेव्हा मी त्यांना एवढेच विचारले होते.

मी कुठेही अंबादास दानवे यांना कापून टाकू, फाडून टाकू अशी धमकी किंवा शिवीगाळ केलेली नाही. दानवे यांनी माझ्या सीडीआरची मागणी केली आहे, माझीही त्यासाठी तयारी आहे. माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी पोलीसांकडून अद्याप आपल्याला कुठलीही विचारणा किंवा फोन आलेला नाही. मला बोलावले गेले तर मी माझ्याकडील काॅल रेकाॅर्डिंग व इतर पुरावे पोलीसांना देणार आहे, असेही अमोल गोंदे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT