Amar rajurkar, Eknath shinde, Ashok chavan  Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan : अशोक चव्हाणांची लाडक्या उमेदवारासाठी ऐनवेळी मोठी खेळी, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर निवडणुकीचं वारं फिरलं; नांदेडमध्ये दगाफटका टळला

Nanded MLC election : मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची मत फुटता कामा नये? याची खबरदारी घेत चव्हाण-राजूरकर जोडीने भेटीगाठींवर भर दिला आहे.

Jagdish Pansare

Nanded MLC News : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीने अशोक चव्हाण यांचे समर्थक आणि लाडके अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली. भाजपकडे मित्रपक्षांचा आकडा गृहित धरून विजयासाठी आवश्यक संख्याबळ असले तरी मित्रपक्षाची भूमिका, महापालिका निवडणुकीत त्यांना दिलेली वागणूक आणि त्यातून निर्माण झालेली नाराजी याचा कुठेही आपल्या उमेदवाराला फटका बसू नये याची काळजी अशोक चव्हाण पुरेपूर घेत आहेत.

विधान परिषदेच्या राज्यातील सतरा पैकी सहा जागा महायुतीने आधीच बिनविरोध काढल्या आहेत. उर्वरित अकरा जागाही महायुतीच जिंकणार असा दावा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून केला जात आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. मित्रपक्षाकडून महापालिकेतील उट्टे यावेळी काढले जाऊ नये, यासाठी चव्हाण अलर्ट झाले आहेत. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची मत फुटता कामा नये? याची खबरदारी घेत चव्हाण-राजूरकर जोडीने भेटीगाठींवर भर दिला आहे.

मंगळवारी दोघांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना नांदेड जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा दिला. आपली मतं पक्की असल्याची खात्री शिंदे यांनी चव्हाण-राजूरकरांना दिली. कुठल्याही परिस्थितीत महायुतीच ही जागा जिंकणार, कुठेही दगाफटका होणार नाही, असा शब्द शिंदे यांच्याकडून मिळाल्यानंतर अशोक चव्हाण, अमर राजूरकर यांचा जीव भांड्यात पडला. नांदेड शिवसेनेमध्ये अशोक चव्हाण यांच्याविरोधात नाराजी आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत (Shivsena) युती न करता या पक्षात फूट पाडत अशोक चव्हाण यांनी स्वबळावर भाजपाची सत्ता आणली. मित्रपक्षाला कचपटा समान वागणूक दिल्याबद्दल शिवसेनेच्या आमदारांमध्ये असलेली नाराजी चव्हाण यांनी या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून दूर करण्याचा प्रयत्न केला. नांदेड जिल्ह्यातील हेमंत पाटील वगळता शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर, बाबूराव कदम यांनी अशोक चव्हाण यांच्याशी जुळवून घेतले आहे.

हेमंत पाटील हे महायुतीच्या कुठल्याच कार्यक्रमांना जात नसले तरी एकनाथ शिंदेंचा आदेश पाळला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 'कोळशाच्या दलालीत आपल्याला हात काळे करायचे नाहीत' असे सांगत त्यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली आहे. असे असले तरी हेमंत पाटील यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे चुकीचे काम होणार नाही, याची खात्री खुद्द एकनाथ शिंदे यांनी दिल्यामुळे अशोक चव्हाण राजूकर निश्चिंत झाल्याचे चित्र आहे.

विधानपरिषदेच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीतील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेटीत राजूरकरांना विजयाचा आशीर्वाद दिला. या निवडणुकीत नांदेडसह राज्यातील सर्व सतरा मतदारसंघांमध्ये महायुतीचेच उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघातही सक्रीय

नांदेडची जागा महायुती जिंकणार, याची खात्री पटल्यानंतर अशोक चव्हाण आता मराठवाड्यातील लातूर-बीड-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही सक्रीय झाले आहेत. भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ लातूर येथील संवाद बैठकीत ते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT