Dhananjay Munde, Pankaja Munde, Bajrang Sonawane
Dhananjay Munde, Pankaja Munde, Bajrang Sonawane sarkarnama
मराठवाडा

Beed Loksabha News : मुंडे बहीण भावांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे....बजरंग सोनवणेंचा आरोप

Umesh Bambare-Patil

Beed Loksabha News : महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे, पंकजा मुंडेवर टीकेची झोड उठवली आहे. गेल्या दहा वर्षांत मुंडे बहीण भावाने विकासावर बोलावे.

मी गेली पाच वर्षे धनंजय मुंडे यांच्यासोबतच होतो. मराठा आरक्षणात सहभागी होण्यापासून त्यांनीच मला रोखले होते. त्यामुळे मराठा आरक्षणावर बोलण्याचा मुंडे बहीण भावाला अधिकार नाही. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोला सोनवणे यांनी लगावला आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे विरुद्ध महायुतीच्या पंकजा मुंंडे अशी लढत होत आहे. यावेळेस जातीच्या मुद्द्यावर ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावावर टीकेची झोड उठवली आहे.

बजरंग सोनवणे यांनी म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांचा मला अभिमान आहे. मराठा आरक्षणात बोलण्याचा मुंडे बहीण भावाला अधिकार नाही. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवायला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गेले होते. त्यावेळेस त्यांनी केलेली खुनवा खुनवी कॅमेरातदेखील कैद झाली आहे.

या निवडणुकीत मुंडे बहीण भावाने विकासावर बोलावे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी काय केलं आणि पुढील पाच वर्षांत काय करणार यावर बोलावे, असे आव्हान देऊन सोनवणे म्हणाले, धनंजय मुंडे यांना अहंकाराची बाधा झाली आहे. यातूनच ते जणू काय महाराष्ट्रातले सर्व पक्ष स्वतः चालत असल्याचे भासवत आहेत.

मुंडे बहीण भाऊ स्वतःच निवडणूक जातीच्या मुद्द्यावरून घेऊन जात आहेत. मी कधीही जातीवरून बोललो नाही. धनंजय मुंडे यांचा बहुरंगीपणा देशाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे, मी काही बहुरंगीपणा करत नाही. मागचे पाच वर्षे मी धनंजय मुंडे सोबतच होतो. मराठा आरक्षणात सहभागी होण्यापासून त्यांनीच मला रोखले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT