Eknath Shinde| Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Eknath shinde : निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा धक्का; दोन टर्म आमदारकी गाजवलेला बडा नेता करणार शिंदेंच्या शिवसेनेत एंट्री

Sharad Pawar News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतून मोठ्याप्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे.

सरकारनामा ब्युरो

युवराज धोतरे

Latur News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतून मोठ्याप्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बसत आहे. आगामी काळात होत असलेल्या नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उदगीर येथील शरद पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भालेराव हे 2009 ते 14 आणि 2014 ते 19 असे सलग दहा वर्ष उदगीरचे आमदार होते.

उदगीरचे माजी आमदार भालेराव हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख मनोज चिखले यांनी दिली. विशेष म्हणजे या माजी आमदारांसोबत भाजपचे पाच ते सहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख ब्रह्माजी केंद्रे, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, अरुणा लेंढाणे आदी यावेळी उपस्थित होते.

माजी आमदार भालेराव हे 2009 ते 14 आणि 2014 ते 19 असे सलग दहा वर्षे भाजपकडून आमदार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली तेव्हापासून ते पक्षात नाराज होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला. त्यांना उमेदवारी मिळाली विधानसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी तब्बल 93 हजारांनी पराभव केला होता.उदगीरच्या माजी आमदारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित झाला आहे. (12 नोव्हेंबर) रोजी मुंबईत हा प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

या आमदारांना असंतुष्ट शहर भाजपच्या एका गटाचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याने नगरपालिकेत सत्ता मिळेल या शक्यतेने ते माजी आमदार व भाजपचा हा गट व्युवरचना आखत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे भाजपच्या या असंतुष्ट गटाने नगरपालिकेत सत्तेची फळे चाखली आहेत. भाजपने त्यांना गेल्या वेळी पक्षात घेऊन निवडुन आणले. यावेळी त्यांना सत्तेत संधी मिळणार नसल्याच्या शक्यतेने ते पक्षविरोधात कुरघोड्या करत असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

शिवसेना शिंदे गटाची ताकद महायुतीतील घटकपक्षा पेक्षा कमी आहे. महायुतीत सहभागी होवुन आपल्या पक्षाचे नगरपालिकेत प्रतिनिधी गेले पाहिजेत, याची मोर्चेबांधणी केल्यास शिवसेनेला पालिकेत संधी मिळु शकते. ही ताकद कोणत्याही परिस्थितीत वाढली पाहिजे, पक्ष मोठा झाला पाहिजे हे सर्वच राजकीय पक्षाचे धोरण असते. मात्र, उदगीर शहरातील जातीय समीकरणे पाहता स्वतंत्र लढल्यास पक्षाला फार मोठी संधी आहे, अशी परिस्थिती नाही.

विरोधकांना मिळू शकते बळ

उदगीर नगरपालिका निवडणुकीत काही घटना बेरजेच्या राजकारणासाठी तर घटना वजाबाकीच्या राजकारणासाठी घडल्या व घडवल्या जात असतात. उदगीरच्या या माजी आमदारांचे पक्षप्रवेश हा याचाच भाग मानला जातो. जर यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला अन महायुती स्वतंत्र लढली तर शिवसेनेच्या उमेदवारीमुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होणे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे विरोधकांना बळही मिळेल. त्यामुळे राजकीय समीकरणे बिघडू शकतात, अशी चर्चा आहे.

तर महायुतीत सहभागी होणार

विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) या दोन्ही गटाकडून कोणत्याही बैठकांना व कार्यक्रमाला बोलावले जात नाही. शिवसेना शिंदे गटाला सन्मानाची वागणूक मिळाल्यास येत्या काळात महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख केंद्रे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT