Dharashiv News: महायुती शासनाच्या काळात आमदार चौगुले यांनी उमरगा- लोहारा तालुक्यासाठी भरघोस निधी खेचून आणला आहे. त्यांच्या अनुभवाचा येणाऱ्या काळात आपल्या भागाचा सर्वांगीण विकासासाठी नक्कीच फायदा होईल. येणाऱ्या कार्यकाळात 21 टीएमसी पाणी आणण्यासाठीच्या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. विधानसभा मतदारसंघात शेतकरी सुजलम सुफलम होईल, असा विश्वास माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला.
सर्वांगीण विकासासाठी चौगुले यांना पुन्हा संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले. उमरगा लोहारा (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chougule) यांच्या प्रचारासाठी आलुर ता. उमरगा येथे जाहीर सभा झाली. यावेळी उपस्थितांना माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी सन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपयांची मदत केंद्रातील सरकार आणि महायुतीकडून दिली जाते आहे.
महिलांसाठी लाडकी बहिण योजना राबवून राज्यातील महायुती सरकारने महिला भगिनींचा सन्मान केला आहे, असे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी सांगितले. (Shivsena) आलूर येथे ग्रामस्थांशी चौगुले यांनी संवाद साधत मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे.
अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढ करुन त्यांना दर महिना पंधरा हजार वेतन, विमा संरक्षण, वृद्ध पेन्शन धारकांना 1500 वरुन 2100 रुपये दिले जाणार आहेत. गावात बसवेश्वर उद्यानात बसवेश्वर पुतळा पुढील काळात बसविण्यात येईल, अशी ग्वाही चौगुले यांनी यावेळी दिली.
माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र शिंदे, जिल्हा परिषद समाज कल्याण माजी सभापती हरीश डावरे, माजी सभापती दिलीपसिंह गौतम,उपसरपंच जितेंद्र पोतदार माजी सरपंच सुरेश बोधे ग्रामपंचायत सदस्य महेश इंगळे माजी उपसरपंच नेलो राठोड, निवृत्त तहसीलदार भीम इंगळे, भीमराव वरनाळे, माजी सरपंच राजकुमार माने, लक्ष्मण तावडे, माजी सरपंच महादेव धुंदगे, रोहन पाटील, महादेव पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.
बसवराज समान, भाजपाचे ब्रह्मानंद उमशेट्टी, संतोष भाकरे, अनिल मरबे ,मल्लिनाथ नारळे, श्रीपाद कुलकर्णी ,गणेश लाटे, नागेश ख्याडे ,संतोष कलशेट्टी, रेवनया स्वामी, बालाजी गुरव, बसवराज ब्याळेकुळे, सिद्राम वाकडे, नैपालसिंग गहिवाळ ,दत्ता बिराडे,माजी सरपंच विलास व्हटकर,शेखर मुद्कना, उपजिल्हाप्रमुख भगत माळी हे यावेळी हजर होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.