Rupali Patil, Tanaji Mutkule  Sarkarnama
मराठवाडा

Hingoli Assembly 2024 Result : हिंगोलीतील चुरशीच्या लढतीत भाजपच्या मुटकुळेंची हॅट्ट्रिक

Hingoli Assembly 2024 Result hat trick Political News : हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांना पुन्हा एकदा मैदानात बाजी मारत हॅट्ट्रिक केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या रुपाली पाटील यांचा 10 हजार 926 मताने पराभव केला.

Sachin Waghmare

Hingoli News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. महायुतीनं तब्बल 232 जागांवर यश मिळवत नेत्रदीपक विजय साकारलेला आहे. महाविकास आघाडीला केवळ ५२ जागांवर यश मिळताना दिसत आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांना पुन्हा एकदा मैदानात बाजी मारत हॅट्ट्रिक केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या रुपाली पाटील यांचा 10 हजार 926 मताने पराभव केला.

हिंगोली मतदारसंघात आतापर्यंत भाजपविरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत झाली होती. यावेळी मात्र काँग्रेसला जागा सुटली नाही. त्यामुळे काँग्रेस (Congress ) वगळून येथील लढत होत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवार रूपाली पाटील गोरेगावकर निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या.

हिंगोलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा असतानाही उद्धवसेनेने उमेदवार दिल्याने काँग्रेसकडून तयारी करीत असलेले माजी आमदार भाऊराव गोरेगावकर अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. येथे आजी, माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे सर्वांना निकालाची उत्सुकता लागली होती.

भाऊराव गोरेगावकर यांची बंडखोरी कोणाच्या पथ्यवर पडणार याची उत्सुकता लागली होती. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी काँग्रेसच्या दिग्ग्ज नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आले नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून भाजपचे तानाजी मुटकुळे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भाऊराव पाटील यांचा चार हजार मताने पराभव केला होता.

या वेळेस पुन्हा भाजपने आमदार तानाजी मुटकुळे यांना संधी दिली आहे. ते हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत होते. महाविकास आघाडीकडून त्यांच्यासमोर ठाकरे सेनेच्या रुपाली पाटील यांनी तगडे आव्हान उभे केले होत. त्यातच माजी आमदार भाऊसाहेब गोरेगावकर यांनी केलेली बंडखोरीचा फटका त्यांना बसला असून या मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT