Sanjay Raut, Rahul Narvekar Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Raut : लवादाने स्वतःच दहा पक्षांतरे केली; राऊत यांचा विधानसभा अध्यक्षांवर निशाणा

Mla Disqualification Case : सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले की, हा जो निकाल आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी विसंगत आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या मर्यादेपलीकडे जाऊन त्यांनी हा निर्णय दिला आहे, कारण त्यांच्यावर तसा दबाव होता.

Amol Sutar

Dharashiv News : शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवत शिवसेनाही त्यांचीच असा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले की, हा जो निकाल आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी विसंगत आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या मर्यादेपलीकडे जाऊन त्यांनी हा निर्णय दिला आहे, कारण त्यांच्यावर तसा दबाव होता.

हा जो लवाद म्हणून बसला आहे, त्याने स्वत:च दहा पक्षांतरे केली आहेत, अशी टीका करत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला, तर आमची लढाई उत्तम चालली आहे. आम्ही लढू, न्यायालय आणि जनतेचे न्यायालय या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे ही लढाई लढत आहेत आणि विजय आमचाच होईल, असा दावा त्यांनी या वेळी केला. तसेच या सरकारमध्ये सर्व गोष्टी बेकायदेशीर होत असून, सर्व गोष्टी घटनाबाह्य असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार राऊत धाराशिव (Dharashiv) दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी चोर आणि लफंग्यांना पात्र ठरविलं आहे. घटनेच्या दहाव्या शेड्युलनुसार पक्षांतरबंदी कायद्यानुसार या शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविणं परिहार्य होतं, पण त्या घटनेची पायमल्ली करून नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरविलं.

इतकंच नव्हे तर विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेना त्यांचीच असा निर्णय देऊन स्वत:चं हसं करून घेतलं. त्याविरोधात दिलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड (Chandrachud) यांनी सांगितले की, हा जो निकाल आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी विसंगत आहे. विधिमंडळातील बहुमतावरून पक्ष कोणाचा आहे हे ठरत नाही, पण त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या मर्यादेपलीकडे जाऊन त्यांनी हा निर्णय दिला आहे, कारण त्यांच्यावर तसा दबाव होता, असा आरोप करत राऊतांनी त्यांच्यावर टीका केली.

राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्ष म्हणून हा जो लवाद बसला आहे, त्याने स्वत:च दहा पक्षांतरे केली आहेत. ते राष्ट्रवादी, शिवसेना (Shivsena) आणि आता भाजपत जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. या सगळ्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असल्याचे या निकालपत्रावरून दिसते. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाबाबत आशा आहे की, लवादाने चोरमंडळाच्या बाजूने कोणता जरी निर्णय दिला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणे दाखविली आहेत आणि त्याचबाबतीत आम्ही आशावादी आहोत. फक्त वेळकाढूपणा नको, असे राऊत म्हणाले.

हाच यांचा बनावटपणा...

चोरमंडळाचे वकील दररोज नवीन मुद्दे समोर आणत आहेत. भंपक खोटेपणा त्यांच्या मुद्द्यांमध्ये असतो. सुनावणी संपली असून फक्त निकाल द्यायाचा आहे, असे असताना नवीन मुद्दे आणण्याचे काय कारण. काल शिंदे गटाच्या वकिलाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाने खोटी कागदपत्रे आणली, असा दावा केला. त्यावर राऊत म्हणाले, कोणती खोटी कागदपत्रे, शिवसेना ही बनावट आहे का, बाळासाहेब ठाकरे बनावट आहेत का? त्यांनी स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे का? असा सवाल करत हे बाळासाहेब ठाकरे यांचे अस्तित्वच मान्य करत नाहीत, हाच बनावटपणा या लोकांचा आहे, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारमध्ये सर्व गोष्टी बेकायदेशीर...

आमची लढाई उत्तम चालली आहे. आम्ही लढू, न्यायालय आणि जनतेचे न्यायालय या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे ही लढाई लढत आहेत आणि विजय आमचाच होईल, असा दावा संजय राऊत यांनी या वेळी केला. तर या सरकारमध्ये सर्व गोष्टी बेकायदेशीर होत आहेत. सर्व गोष्टी घटनाबाह्य होत आहेत, असा आरोप त्यांनी या वेळी केला.

भाजपच्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तिकीट डावलल्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, बावनकुळे हे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरींसारख्या मोठ्या नेत्याला तिकीट देण्याबाबत ठरवणार का? असा सवाल त्यांनी केला. तसेच महाविकास आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. आम्ही सर्व एकत्र बसतो. ते स्वतः बैठकीला उपस्थित होते. बैठकीत काय घडले हे आम्ही बाहेर बोलायचे की नाही ते ठरवतो.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT