Shivsena Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News: शिवसेना नेत्याने सांगितली आतली माहिती; 'मंत्र्यांची दर तीन महिन्यांनी होणार...'

Political News : अनेकांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने नाराजी असतानाच त्यातच शिवसेनेच्या नेत्याने बैठकीतील आतली बातमी सांगितली आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या मंडळींचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री खातेवाटप केले. खातेवाटप केल्यानंतर मलईदार खाते मिळाल्याने काही जण खुश तर काही जण नाराज आहेत. दुसरीकडे अनेकांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने नाराजी असतानाच त्यातच शिवसेनेच्या नेत्याने बैठकीतील आतली बातमी सांगितली आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या मंडळींचे त्याकडे लक्ष लागले आहे. (Shivsena News)

राज्यातील निवडणुकाची प्रक्रिया पूर्ण होऊन सोमवारी एक महिना पूर्ण होणार आहे. खातेवाटप झाल्याने आता सोमवारीच नवे मंत्री आपल्या खात्याचा पदभार घेऊन काम करण्यास सुरुवात करणार आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष लागले असतानाच शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या बैठकीतील माहिती दिली. मंत्रिमंडळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी काही निकष ठरवले आहेत. त्या निकषांमुळे सुमार कामगिरी करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांवर टांगती तलवार कायम असणार आहे.

येत्या काळात शिवसेना नेते एकनाथ शिंदे दर तीन महिन्यांनी मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मंत्र्यास काम करणे गरजेचे आहे. जे शिवसेनेचे मंत्री काम करणार नाहीत त्यांची खाती काढून घेतले जाणार आहेत. त्यामुळे सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरी कशी राहिली त्याचा आता दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्र्यास काम करणे गरजेचे आहे. जे शिवसेनेचे मंत्री काम करणार नाहीत त्यांची खाती काढून घेतले जाणार आहेत. ज्यांची कामगिरी चांगली नसले त्यांचे मंत्रिपद जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असल्याचे शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी दिली आहे, त्याचे काम लगेच सुरु करणार आहे. संभाजीनगरचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार, हे वरिष्ठ नेते ठरवणार आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपदाबाबत बोलणे उचित ठरणार नाही, असे यावेळी संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले

त्यासोबतच येत्या काळात कोणीही पालकमंत्री असो, आमदार असो की खासदार असो, शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समान निधीचे वाटप करण्यात येईल. जर असमान निधीचा वाटप झाले असेल तर कारवाई होणार आहे. त्यासाठी डीपीडीसीचा अहवाल आपण मागितला आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT